कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला

महिला कॉन्स्टेबल रुची सिंह 13 फेब्रुवारीपासून ड्युटीवर आली नव्हती. यानंतर महिला कॉन्स्टेबलच्या सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र रुची सिंहचा फोन सतत बंद येत होता. यानंतर सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला
लेडी कॉन्स्टेबल रुची सिंह
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:54 AM

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये (Lucknow Uttar Pradesh) नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. तपासादरम्यान हा मृतदेह पोलीस कॉन्स्टेबल रुची सिंह (Police Constable Dead Body) हिचा असल्याचं समोर आलं आणि पोलीस दल हादरुन गेलं. प्रेम प्रकरणातून महिलेला प्राण गमवावे लागल्याचा दावा केला जात आहे. फेसुबकच्या माध्यमातून महिलेची ओळख नायब तहसीलदारांसोबत झाली होती. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झाल्याचीही चर्चा आहे. धक्कादायक म्हणजे दोघेही विवाहित आहेत आणि पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र महिला कॉन्स्टेबल लग्नासाठी दबाव आणत असल्याचं बोललं जातं. यातूनच तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक-एक पुरावे जोडून या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबल रुची सिंह 13 फेब्रुवारीपासून ड्युटीवर आली नव्हती. यानंतर महिला कॉन्स्टेबलच्या सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र रुची सिंहचा फोन सतत बंद येत होता. यानंतर सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.

नाल्यात महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह

काली माता परिसरातील नाल्यात रुची सिंहचा मृतदेह सापडला होता. लखनौच्या पीजीआय पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सुशांत गोल्फ पोलिस स्टेशनला याची माहिती दिली. यानंतर कॉन्स्टेबल रुचीसोबत काम करणारे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. यासोबतच बिजनौरमधील महिला कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून तिचा मृत्यू झाला आहे. लेडी कॉन्स्टेबल रुचीचे लग्न एका कॉन्स्टेबलसोबतच झाले होते. ते सध्या कुशीनगर येथे तैनात आहेत.

पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये

प्रतापगडमधील राणीगंज येथे तैनात असलेल्या नायब तहसीलदाराने फेसबुकच्या माध्यमातून रुचीशी मैत्री केली होती. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढत गेल्या. दोघेही गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. नायब तहसीलदारही विवाहित असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र महिला कॉन्स्टेबल त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचं बोललं जातं.

या प्रकरणी पोलीस आरोपी नायब तहसीलदाराची चौकशी करत आहेत. महिलेची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महिलेचा मृतदेह नाल्यात कसा सापडला, याचे गूढ लवकरच उकलणार असल्याचे लखनौ पोलिसांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध, 27 वर्षीय विवाहितेला बेड्या, अकोल्यात काय घडलं?

पुण्यात अनैतिक संबंधांतून घरमालकिणीची हत्या, दहा दिवसांनी भाडेकरुला बिहारमध्ये बेड्या

14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.