जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर

हल्लेखोरांनी संकटा प्रसाद, हनुमान यादव, धन्नो देवी, नयका देवी, राजकुमार यादव, अशोक कुमार यांना लाठ्या काठ्यां आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली. यानंतर सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर
उत्तर प्रदेशातील चौघांची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 8:38 AM

अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये (Amethi) जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. एकाच कुटुंबातील चौघा जणांची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. संबंधित कुटुंबातील सदस्यांवर दुसऱ्या कुटुंबाने लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला (Uttar Pradesh Crime) चढवला होता. हल्ल्यात चौघा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील अमेठीमधील गुंगवाछ येथील राजापूर कौहारमध्ये ही घटना घडली. संकटा प्रसादच्या घराच्या जवळ ग्रामसभेची जमीन आहे. रामदुलारे, बृजेश आणि अखिलेश जबरदस्ती त्यावर कब्जा करत होते. जेव्हा संकटा प्रसादने त्यांना विरोध केला, तेव्हा अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबाने संकटा आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.

उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू

हल्लेखोरांनी संकटा प्रसाद, हनुमान यादव, धन्नो देवी, नयका देवी, राजकुमार यादव, अशोक कुमार यांना लाठ्या काठ्यां आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली. यानंतर सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे संकटा प्रसाद, हनुमान यादव, अमरेश यादव आणि पार्वती यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

प्रेमचा असाही अंत, आधी तिच्या पैशांवर कमाई अन् शेवटी जीव जाईपर्यंत मारहाण, काय घडलं औरंगाबादेत?

कार अडवून डोळ्यात मिर्चीपूड फेकली, भर रस्त्यात बिल्डरच्या हत्येचा थरार

पोटचा गोळा रोज घरात झिंगायला लागला, आई अन् भावानं त्याचा निकाल लावला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.