AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नावडती भाजी करण्यावरुन वाद, त्यात बायकोच्या तिखट शब्दांची फोडणी, नवऱ्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

दाम्पत्यामध्ये बाचाबाची सुरु असतानाच पत्नी लक्ष्मी देवीचे काही शब्द त्याला चांगलेच बोचले. त्यामुळे सुभाष अधिकच चिडला आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता त्याने पत्नीवर थेट कुऱ्हाडीने वार करण्यास सुरुवात केली.

नावडती भाजी करण्यावरुन वाद, त्यात बायकोच्या तिखट शब्दांची फोडणी, नवऱ्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न
पतीकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्नImage Credit source: टीव्ही 9
| Updated on: May 11, 2022 | 12:19 PM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) लखनऊमध्ये पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. तेही फक्त बायकोने त्याच्या आवडीचे जेवण बनवले नाही म्हणून. हे प्रकरण मोहनलालगंज मधील गणेश खेडा येथील आहे. नावडती भाजी करण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याला बायकोच्या तिखट शब्दांची फोडणी बसली. त्यानंतर नवऱ्याने तिला अर्धमेली होईपर्यंत कुऱ्हाडीने मारलं. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीला आले, तेव्हा पती पळून गेला. या घटनेनंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर आरोपी पतीला पोलिसांनी अटक (Husband Arrested) करुन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशखेडा येथे राहणारा सुभाषचंद्र गौतम हा रात्री उशिरा घरी पोहोचले. पत्नी लक्ष्मी देवीने आपल्या आवडीचे जेवण बनवले नसल्याचे समजताच त्याने तिच्याशी वाद उकरुन काढला.

नेमकं काय घडलं?

दाम्पत्यामध्ये बाचाबाची सुरु असतानाच पत्नी लक्ष्मी देवीचे काही शब्द त्याला चांगलेच बोचले. त्यामुळे सुभाष अधिकच चिडला आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता त्याने पत्नीवर थेट कुऱ्हाडीने वार करण्यास सुरुवात केली.

महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांची धाव

पतीने कुऱ्हाडीने वार करताच पत्नीने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली, पण निर्दयी पतीने तिच्यावर हल्ला करणे थांबवले नाही. त्याने तिला कुऱ्हाडीचे घाव घालून अर्धमेली केली. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी तिथे धावत आले असता पतीने तिथून पळ काढला. शेजाऱ्यांनी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पतीला अटक, पत्नीवर उपचार सुरु

दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने आरोपी पतीचा शोध सुरू केला. पोलिसांनी लगेचच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपी बसमध्ये बसून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीची अद्याप चौकशी सुरू आहे. पुढील कारवाई अद्याप सुरू आहे. जखमी महिलेचाही जबाब घेण्यात येणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.