ब्लॅकमेलिंगला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या, नंतरही टवाळखोरांकडून अश्लील व्हिडीओ शेअर

विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतरही आरोपी तिचा व्हिडीओ व्हायरल करत होता. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.

ब्लॅकमेलिंगला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या, नंतरही टवाळखोरांकडून अश्लील व्हिडीओ शेअर
विद्यार्थिनीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 4:03 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) कानपूरमध्ये विनयभंग आणि ब्लॅकमेलिंगची (Molestation and Blackmailing) लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीने दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून जीव दिला. मात्र त्यानंतरही आरोपी तिचे अश्लील छायाचित्र व्हॉट्सअॅपवर शेअर करून बदनामी करत होते. ही घटना कानपूरच्या ग्वालटोली पोलीस स्टेशन परिसरातील आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी आधी एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिचा मेसेज आणि व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. यानंतर बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीने 8 मे रोजी आत्महत्या (Student Suicide) केली.

काय आहे प्रकरण?

आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रिपोर्टनुसार, आधी आरोपीने मुलीला प्रेम प्रकरणात अडकवले आणि नंतर अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

मुलीच्या आत्महत्येनंतरही व्हिडीओ व्हायरल

विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतरही आरोपी तिचा व्हिडीओ व्हायरल करत होता. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.

हे सुद्धा वाचा

दोन्ही आरोपींना अटक

पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी केली असता, दोन्ही आरोपी अश्लील मेसेज एडीट करून विद्यार्थिनीची बदनामी करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणाबाबत एसीपी त्रिपुरारी पांडे यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती, यावरून कुटुंबीयांनी दोन तरुणांवर मुलीला प्रेम प्रकरणात अडकवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येत आहे.

महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.