Viral News : निवृत्त अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉल करून तरुणीचे अश्लील कृत्य, चार लाख रुपये घेतल्यानंतर…
Viral News : निवृत्त अधिकाऱ्याने व्हिडिओ कॉल उचलला, तरुणीचं अश्लील कृत्य, चार लाख घेतले, तरी सुध्दा म्हणते...
उत्तर प्रदेश – राज्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला (retired officer) एका तरुणीने चार लाख (four lack) रुपयांना गंडा घातल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. आतापर्यंत असे अनेक गुन्हे उजेडात आल्यानंतर सुध्दा लोकांना फसवलं जात आहे. पोलिसांनी (UP police) या प्रकरणाची नोंद करुन घेतली आहे. त्याचबरोबर त्या तरुणीचा शोध घेत असल्याचे सांगितले आहे.
नेमकं काय झालं
वयोवृध्द अधिकाऱ्याला एका तरुणीने व्हाट्सअप्पला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर ती अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. ज्यावेळी अधिकाऱ्याने तिला ब्लॉक केले, त्यावेळी ती इतर मोबाईल नंबरवरुन कॉल करुन त्रास देऊ लागली.
अधिकाऱ्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊ लागली. भीतीपोटी त्या अधिकाऱ्याने तरुणीला चार लाख रुपये पाठवले. त्यानंतर सुध्दा ती तरुणी निवृत्त अधिकाऱ्याला कॉल करुन त्रास देऊ लागली. त्यानंतर त्रासाला कंठाळलेल्या अधिकाऱ्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
गोमतीनगर विस्तार निवासी निवृत्त अधिकारी यांनी पोलिसांना दिलेली माहिती, रात्री तरुणी व्हिडीओ कॉल करुन अश्लिल कृत्य करीत होती. फोन कट केल्यानंतर सुध्दा अधिक वेळ कॉल करण्यात आला.