प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकला, प्रेमी युगुलाला अटक

निपेंद्रची हत्या पत्नी कुसुम हिने प्रियकर नीरजच्या हातून केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत कुसुमने सांगितले की, निपेंद्रला दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिऊन तो तिला अनेकदा मारहाण करत असे, त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकला, प्रेमी युगुलाला अटक
प्रियकराच्या साथीने पतीची हत्याImage Credit source: आज तक
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 3:36 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) मुरादाबादमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह पतीची हत्या (Husband Murder) करुन त्याचा मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात (Jim Corbett National Park) फेकून दिला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. महिलेचे लग्नाआधी प्रेमसंबंध होते. मात्र लग्नामुळे त्यात अडथळा आला. लग्नानंतर दोन वर्षांनी प्रियकराशी तिची पुनर्भेट झाली, त्यानंतर दोघं पुन्हा एकत्र आले. विवाहबाह्य संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील महालकपूर निजापूर येथील रहिवासी कुसुम पाल हिचा विवाह 2010 मध्ये बिजनौरमधील धामपूर येथील निपेंद्रसोबत झाला होता. निपेंद्र हा गेल्या काही दिवसांपासून पत्नी कुसुमसह सासरच्या घरी राहत होता. 5 मे 2022 रोजी निपेंद्र अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकला

या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तपास सुरू केला असता निपेंद्रची हत्या पत्नी कुसुम हिने प्रियकर नीरजच्या हातून केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत कुसुमने सांगितले की, निपेंद्रला दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिऊन तो तिला अनेकदा मारहाण करत असे, त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. पतीचा मृतदेह जिम कॉर्बेटच्या जंगलात फेकून दिला. कुसुमशी प्रेमसंबंध असल्याने तिच्या पतीची हत्या केल्याचे आरोपी नीरजने सांगितले.

हे सुद्धा वाचा

नीरजने सांगितले की, आमचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. कुसुमचे लग्न झाले आणि आमचे नाते संपुष्टात आले. पण त्यानंतर दोन वर्षांनी आमचं बोलणं सुरु झालं. निपेंद्रला खूप दारु पाजून आम्ही ठार मारलं, कारण तो आमच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यानंतर जिम कॉर्बेटचे जंगल असलेल्या डोंगरावरून त्याचा मृतदेह खाली फेकण्यात आला” दुसरीकडे, मृत निपेंद्रच्या भावाने सांगितले की, त्याला त्याच्या वहिनीवर आधीच संशय होता.

एसपी सिटी अखिलेश भदौरिया यांनी सांगितले की, 5 मे रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात निपेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. 10 मे रोजी निपेंद्रच्या कुटुंबीयांनी निपेंद्रची पत्नी कुसुम हिच्यावर संशय व्यक्त केला. कुसुमची चौकशी केली असता तिच्या अफेअरची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच नीरजचीही चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. या हत्येतील आणखी दोन जण अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.