Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात चार चिमुरड्यांचा मृत्यू, दारात फेकलेल्या टॉफी खाल्ल्याने जीव गेल्याचा आरोप
मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दरवाजात फेकलेल्या गोळ्या खाल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये चार चिमुरड्यांचा मृत्यू (Children Death) झाला. एकाच वेळी चार चिमुकल्यांना प्राण गमवावे लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दरवाजात फेकलेल्या टॉफी (toffee) खाल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. दोन कुटुंबातील चार चिमुकल्यांना या घटनेत प्राण गमवावे लागले. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मयत चिमुरड्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आज (बुधवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास लहान मुलं उठली. त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला तेव्हा दरवाजात काही टॉफी म्हणजेच गोळ्या पडल्या होत्या. दोन कुटुंबातील चार चिमुरड्यांनी या गोळ्या वाटून खाल्ल्या. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. बघता बघता चौघाही जणांचा एकामागून एक मृत्यू झाला.
मृतांमध्ये दोन लहान मुलं आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या :
मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
Nagpur येथे अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले, चारपैकी दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू
रसवंती यंत्रात पदर अडकला, नांदेडमध्ये 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू