Extramarital Affair : दीरासोबत विश्वासघात सुरु होता, किंमत चुकवावी लागली वहिनीला…घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का
Extramarital Affair : एकत्र कुटुंबात राहत असताना समोर आलेल्या रहस्यामुळे कुटुंबातील एका सदस्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे सर्व समोर आल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. रात्री उशिरा कांतीचा मृतदेह जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला.

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या जावेचा घरातल्या सूनेनेच काटा काढला. इतका वेदनादायी मृत्यू दिला की, घरातले सगळेच हादरले आहेत. जावेला समजेलं की, दीराची बायको त्याला फसवत आहे. तिचं बाहेर दुसऱ्याकोणाबरोबर तरी अफेयर सुरु आहे. जावेला हे समजल्यानंतर ती दीराच्या पत्नीला वारंवार टोकायची. ही गोष्ट दुसऱ्या सूनेला खटकत होती. म्हणून तिने प्रियकरासोबत मिळून मोठ्या जावेचा काटा काढला, उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. जावेची हत्या केल्यानंतर ती आत्महत्या वाटावी, यासाठी मृतदेह शेतात झाडाला लटकवला. पोलीस चौकशीत दीराच्या बायकोनेच जावेची हत्या केल्याच उघड झालं. पोलिसांनी सूनबाई आणि तिच्या प्रियकराला अटक करुन तुरुंगात पाठवलं आहे. कोटरा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या नुनवईमधील हे प्रकरण आहे.
1 एप्रिल रोजी शिवराम पाल यांची पत्नी कांती देवी घरातली छोटी सून खुशबूसोबत शेतात कापणीसाठी गेली होती. संध्याकाळी खुशबू घरी परतली. पण कांती आली नाही. खुशबूला या बद्दल कुटुंबियांनी विचारलं. पण खुशबू योग्य उत्तर देत नव्हती. कांती देवी म्हणजे मोठी जाऊ शेतात कापणीच काम करतेय असं उत्तर दिलं.
ते पाहून कुटुंबियांचे धाबे दणाणले
रात्र होत आली तरी कांती देवी घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. रात्री उशिरा कांतीचा मृतदेह जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ते पाहून कुटुंबियांचे धाबे दणाणले. त्यांनी तात्काळ या बद्दल पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, कोटरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विमलेश कुमार आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. फॉरेंसिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले. मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला.
….तेव्हा मोठा खुलासा
प्रथमदर्शनी प्रकरण आत्महत्येच वाटत होतं. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मोठा खुलासा झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून कांतीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याच समजलं. शरीरावर जखमा होत्या. पोलिसांनी खुनाच्या अँगलने तपास सुरु केला. पोलिसांनी तपासात अनेक पुरावे गोळा केले. त्यानंतर कांतीच्या हत्या प्रकरणात खुलासा झाला.
राजपालसोबत बघितलं होतं
पोलिसांना जे पुरावे मिळाले, त्यातून स्पष्ट झालं की, कांतीची हत्या अजून कोणी नाही, घरातील दुसरी सून खुशबूने केली आहे. पोलिसांनी खुशबू आणि तिच्या प्रियकराला अटक केली. चौकशी केल्यानंतर खुशबूने गुन्हयाची कबुली दिली. जाऊबाई कांतीने खुशबूला तिचा प्रियकर राजपालसोबत बघितलं होतं. कांती त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत होती. म्हणून त्यांनी कांतीची हत्या करुन तिला बाजूला केलं.