कौटुंबिक वाद टोकाला गेला अन् सहा भावंडं आईच्या मायेला पारखी झाली, काय घडलं नेमकं?

लग्नानंतर काही दिवस त्या दोघांचा संसार सुरळित चालू होता. पण अचानक दोघांच्या वादाची ठिणगी पडली अन् संसाराचा थेट अंतच झाला.

कौटुंबिक वाद टोकाला गेला अन् सहा भावंडं आईच्या मायेला पारखी झाली, काय घडलं नेमकं?
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 9:28 PM

मेरठ : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत तपास सुरु केला आहे. फरजाना असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपीला गावकऱ्यांनी पकडले होते. मात्र गावकऱ्यांना चकवा देऊन तो फरार झाला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या जोडप्याला तीन मुली आणि तीन मुलगे असून, आईच्या मृत्यूमुळे मुलं पोरकी झाली. पती-पत्नीत नेमका काय होता, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

पती-पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे

पती-पत्नीमध्ये दररोज वाद व्हायचे. आरोपी नसरुद्दीन पत्नीला नेहमी मारहाण करायचा. अनेकदा शेजाऱ्यांनी मध्यस्थी करुन दोघांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद मिटण्याचे नावच घेत नव्हते. सोमवारी फरजाना घरी एकटी होती. ही संधी साधत नसरुद्दीन तिची हत्या केली. घटना घडल्यानंतर घरी आलेल्या मुलीने आईला मृतावस्थेत पाहून आरडाओरडा केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले.

हत्येनंतर आरोपी फरार

आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घरी धावत घेतली. यानंतर शेजाऱ्यांनी नसरुद्दीनला पकडून त्याची धुलाई केली. मात्र तरीही शेजाऱ्यांना चकवा देऊन तो पळून जाण्यास यशस्वी झाला. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी नसरुद्दीनविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे फरजानाची सहा मुलं आईच्या मायेला पोरकी झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.