लज्जास्पद ! आधी अत्याचार, मग ७ व्या महिन्यातच जबरदस्ती केली प्रसूती; नवजात बाळाला थेट जमिनीतच..
हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीसांनी कारवाई सुरू केली. आपले कुटुंबियही आरोपींशी सहमत असल्याचे पीडितेने सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
बरेली | 29 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका तरूणी सोबत जे घडलं ते वाचून तुम्ही देखील हादराल. अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाचं आश्वासन देत आरोपीने प्रथम तरूणीवर अत्याचार (crime news) केला. यामुळे ती गरोदर राहिल्यानंतरही त्याचं मन द्रवलं नाही. तिला सातवा महिना सुरू असताना तिचा जबरदस्ती गर्भपात करण्यात आला. आणि नवजात बाळ जिवंत अवस्थेतच दफन करण्यात आले.
हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पीडित तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण
लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तरूणीवर अत्याचार आणि गर्भपाताचे हे प्रकरण बरेलीच्या कँट पोलीस स्टेशन परिसरातील आहे. तेथे राहणाऱ्या एका तरूणीने सांगितले की, शाहरुख नावाच्या तरुणाशी तिची मैत्री झाली. त्याने तिला लग्नाचे आश्वासनही दिले. दोघांची वारंवार भेट होऊ लागली. त्याचदरम्यान आरोपी तिला मावशीच्या घरी बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. याचदरम्यान ती तरूणी गरोदर राहिली. तिने आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला, मात्र आरोपी थातूरमातूर उत्तर देत तिला टाळत राहिला.
त्यानंतर 1 ऑगस्ट 2023 रोजी आरोपीने तिची समजूत काढली आणि तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याचे कुटुंबिय पीडितेला रुग्णालयात घेऊन गेले आणि जबरदस्ती तिचा गर्भपात करायला लावला. तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. पीडितेने सात महिन्यांच्या बालिकेला जन्म दिला. मात्र आरोपीने त्याल बाळाला तिच्याकडून घेतले आणि अज्ञात स्थळी जाऊन दफन केले.
तीन दिवस होती बेशुद्ध
या सर्व प्रकाराला तरूणीने विरोध करू नये म्हणून आरोपीच्या कुटुंबीयांनी तिला नशेचे इंजेक्शन देऊन तीन दिवस बेशुद्ध ठेवले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने आपल्या बाळाबद्द विचारले असता आरोपी व कुटुंबियांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धकमी देत तेथून हाकलूनही लावले.
पोलिसांनी कारवाईच केली नाही
या संपूर्ण प्रकारामुळे हादरलेल्या तरूणीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पण पोलिसांनी आरोपीविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असे पीडितेचे म्हणणे आहे. अखेर तिने हिंमत गोळा करत एसएसपीकडे तक्रार केली. त्यांच्या आदेशानंतर पोलिस कामाला लागले असून आरोपी व त्याचे नातेवाईक अशा ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.