बाबांना हार्ट ॲटॅक आला आहे, तू लवकर ये; कॉल आल्यावर गर्लफ्रेंडच्या घरी धावत गेला अन् झाला गदारोळ
प्रेयसीच्या घरच्यांच्या रोषाला बळी पडलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुजफ्फरपूर | 14 ऑक्टोबर 2023 : पहाटे ४ वाजता अर्जुनला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला, तेव्हा त्याचा जीव धोक्यात येईल असं काही घडेल याची त्याला कल्पनाही नव्हती. बाबांना हार्ट ॲटॅक आला आहे, तू लवकर घरी ये अस त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सांगितलं. हे ऐकून अर्जुन थक्क झाला. त्यानंतर घरातून जिमला जाण्याऐवजी तो थेट गर्लफ्रेंडच्या घरी तर गेला पण तिथे त्याच्यासोबतच असं काही घडलं की त्याला थेट हॉस्पिटल गाठावं लागलं.
उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुझफ्फरपूरचे हे प्रकरण आहे. नगर पोलिस ठाण्याच्या गोलाबांध रोड येथील रहिवासी तरुणावर त्याचया प्रेमिकेच्या कुटुंबियांनी हल्ला केला. त्याला घरी बोलावले आणि त्याचा प्रायव्हेट पार्टच (cut down private part) कापला. त्यासोबतच त्याची सोन्याची चेन, अंगठी आणि मोबाइल हिसकावून नेला.
सध्या तया रुणावर बैरिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मुलीची आई आणि तिच्या भावावर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याच्या वडिलांनी संपूर्ण घटना कथन केली.
‘माझ्या मुलाचे एका मुलीवर प्रेम होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकत्र होते. मात्र मुलीच्या कुटुंबियांना याचा राग आला. त्यांनी कट रचून मुलीकरवी माझ्या मुलाला फोन करून पहाटे साडेचार वाजता आपल्या घरी बोलावले. तिचा फोन येताच माझा मुलगा तिच्या घरी जायला निघाला. मात्र तेव्हा त्या मुलीच्या भावाने रस्त्यातच त्याला अडवून त्याच्या दुकानात खेचले. तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला. तेथे त्या मुलीचे आई-वडीलही उपस्थित होते. माझा मुलगा तेथून कसाबसा पळाला. सध्याआम्ही त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टर म्हणाले ‘ असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.