AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : चार मुलांची आई प्रेमात बुडाली, नवरा बाहेर जाताच बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, मग…

Extramarital Affair : शनिवारी महिलेच्या घराजवळ दसऱ्याची जत्रा भरलेली. प्रियकर तिला भेटण्यासाठी आला होता. महिलेने घरी सांगितलं की, ती जत्रेसाठी चालली आहे. रात्रभर ती तिच्या प्रियकरासोबत होती. दुसऱ्यादिवशी नवऱ्याने तिला रागात विचारलं, कुठे होतीस रात्रभर?

Extramarital Affair : चार मुलांची आई प्रेमात बुडाली, नवरा बाहेर जाताच बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, मग...
Extramarital Affair
| Updated on: Oct 15, 2024 | 2:21 PM
Share

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण प्रेमात पडताना भान मात्र नक्कीच असलं पाहिजे. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियावरुन अनेकांचे सूर जुळतात. एका महिलेची सोशल मीडियावर एका युवकाशी ओळख झाली. पुढे ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. सदर महिला विवाहित असून तिला चार मुलं आहेत. प्रेम नवीनच असल्यामुळे दोघे दिवस-रात्र बोलू लागले. दोघांमध्ये भेटीची आतुरता निर्माण झाली. महिलेच्या घराजवळ जत्रा लागते. त्यावेळी भेटायचं दोघांनी ठरवलं. तो दिवस आला. शनिवारी महिलेच्या घराजवळ दसऱ्याची जत्रा भरलेली. प्रियकर तिला भेटण्यासाठी रामपुरहून आला होता. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधील हे प्रकरण आहे.

महिलेने घरी सांगितलं की, ती जत्रेसाठी चालली आहे. रात्रभर ती तिच्या प्रियकरासोबत होती. दुसऱ्यादिवशी नवऱ्याने तिला रागात विचारलं, कुठे होतीस रात्रभर?. त्यावर तिने मैत्रिणीकडे गेली होती, असं उत्तर दिलं. जोडप्यामध्ये भांडण सुरु झालं. घरात भरपूर भांडणं झाली. दुसऱ्यादिवशी पती काही कामानिमित्त घराबाहेर गेला. त्यावेळी महिलेने तिच्या प्रियकराला बोलवून घेतलं. दोघांचा बेडरुममध्ये रोमान्स चाललेला. त्याचवेळी महिलेचा पती तिथे अचानक आला.

दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं

पत्नीला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेमध्ये पाहून नवऱ्याचा पारा चढला. तो लगेच पोलीस स्टेशनला गेला. त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. पोलीस महिलेच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याला इशारा देऊन पुन्हा रामपुरला पाठवून दिलं. पण त्यानंतरही महिला सुधारली नाही. सोमवारी नवरा कामावर जाताच तिने पुन्हा प्रियकराला बोलवून घेतलं. मुलांना बाहेर खेळायला पाठवलं. महिलेचा बेडरुममध्ये प्रियकरासोबत रोमान्स चाललेला. त्याचवेळी पुन्हा नवरा तिथे आला. दोघांना नको त्या अवस्थेत पाहून जोरदार गदारोळ झाला. स्थानिकांनी त्या युवकाला पकडलं.

पोलिसांनी काय केलं?

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पोलीस आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. चार तास त्याची चौकशी केली. पुन्हा पोलिसांनी त्याला समज देऊन सोडलं. आता हे प्रकरण या भागात चर्चेच विषय बनलय.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.