मुलाची कमाल, बाप बेहाल, सावत्र आईसोबत मुलाची लगीनगाठ, पित्याची पोलिसात तक्रार

दुसरी पत्नी माहेरी गेली आणि अनेक दिवस परत आली नाही, म्हणून तो तिला आणायला गेला, तेव्हा त्याला कळलं की ती त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलासोबत राहते. मुलाने सावत्र आईसोबतच लग्न केल्याचा आरोप पीडित पतीने केला आहे.

मुलाची कमाल, बाप बेहाल, सावत्र आईसोबत मुलाची लगीनगाठ, पित्याची पोलिसात तक्रार
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 12:07 PM

देहरादून : उत्तराखंडमधील (Uttarakhand Crime News) उधम सिंह नगर जिल्ह्यात नात्यांची लक्तरं वेशीवर टांगणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या सावत्र आईशी लग्न (Step Mother) केले. ही घटना लोकांना समजली जेव्हा महिलेच्या पतीने पोलिस स्टेशन गाठून मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या आई-मुलाचे लग्न (Wedding) हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

काय आहे प्रकरण?

उधम सिंह नगर जिल्ह्यातील कोतवाली बाजपूरमध्ये ही घटना घडली आहे. पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 11 वर्षांपूर्वी त्याने दुसरं लग्न केलं होतं. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. मात्र दुसऱ्या लग्नानंतर त्याची दोन्ही मुले त्याला सोडून गेली. दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. या काळात पहिल्या पत्नीच्या मुलांचे घरी येणे-जाणे सुरु झाले. सगळे जण एका कुटुंबासारखे एकत्र राहत होते.

हे सुद्धा वाचा

मुलगा सावत्र आईसोबत

दरम्यान, दुसरी पत्नी माहेरी गेली आणि अनेक दिवस परत आली नाही, म्हणून तो तिला आणायला गेला, तेव्हा त्याला कळलं की ती त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलासोबत राहते. मुलाने सावत्र आईसोबतच लग्न केल्याचा आरोप पीडित पतीने केला आहे. पत्नीला आणण्यासाठी गेला असताना आपल्याला मारहाण करण्यात आली. पत्नीनेही परतण्यास नकार दिला, असा दावा त्याने केला आहे.

याशिवाय दुसऱ्या पत्नीने 20 हजार रुपये घेतल्याचा आरोपही त्याने केला आहे. आरोपीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बन्ना खेडा चौकीचे प्रभारी अर्जुन गिरी गोस्वामी यांनी सांगितले की, एका व्यक्तीने आपल्या मुलावर त्याच्या सावत्र आईला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.