AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकीच्या नजरेत भरला पुतण्या, दोघे परस्परांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की, एकदिवस…

सदर महिलेच आठ वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. तिला पाच आणि सात वर्षाची दोन मुलं आहेत. 28 वर्षाच्या काकीच बऱ्याच काळापासून पुतण्यासोबत अफेयर सुरु होतं. असं म्हणतात, प्रेम कधीही, कुठेही आणि कोणावरही होऊ शकतं.

काकीच्या नजरेत भरला पुतण्या, दोघे परस्परांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की, एकदिवस...
extramarital affair Image Credit source: AI Image
| Updated on: Apr 02, 2025 | 11:04 AM
Share

असं म्हणतात, प्रेम कधीही, कुठेही आणि कोणावरही होऊ शकतं. त्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. मग, त्यात काय चूक, काय बरोबर. प्रेमात पडलेल्या माणसाला त्याच्या उद्दिष्ट्यापर्यंत पोहोचवणारी प्रत्येक एक गोष्ट योग्य वाटते. आता असच एक प्रकरण उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये समोर आलं आहे. इथे पुतण्याच्या प्रेमात पडलेल्या काकीने घरदार सोडून दिलं. नवरा आणि पदरात असलेल्या दोन मुलांची सुद्धा तिला दया आली नाही. आता ती असा हट्ट करतेय ज्यामुळे नवरा हैराण झालाय.

पुतण्याची सुद्धा काकीसारखी अवस्था आहे. त्याला काकीसोबत लग्न करुन संसार थाटायचा आहे. पोलिसांनी दोघांनी खूप समजावलं. मात्र, तरीही दोघे एकत्र राहण्याच्या हट्टाला पेटले आहेत. हे अजब-गजब प्रकरण कोतवालीच्या लक्सर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. सदर महिलेच आठ वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. तिला पाच आणि सात वर्षाची दोन मुलं आहेत. 28 वर्षाच्या काकीच बऱ्याच काळापासून पुतण्यासोबत अफेयर सुरु होतं. दोघे परस्पराच्या प्रेमात आकंठ बुडून गेले होते. अखेर एकदिवस असा आला की, दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

नवऱ्याच घर सोडलं

महिलेने पुतण्यासोबत राहण्यासाठी नवऱ्याच घर सोडलं. नातेवाईकांनी दोघांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते ऐकले नाहीत. त्यानंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी काकी आणि पुतण्याला पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं, त्यांना समजावलं. पण त्यांनी पोलिसांच सुद्धा ऐकलं नाही.

शेवटपर्यंत तिच्या निर्णयावर ठाम

सुल्तानपुर चौकीचे प्रभारी वीरेंद्र सिंह नेगी यांनी सांगितलं की, महिलेला काहीही झालं, तरी नवऱ्यासोबत रहायच नाहीय. महिलेने पुतण्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. महिला शेवटपर्यंत तिच्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर पोलिसांनी महिलेला पुतण्यासोबत पाठवलं. पण महिलेला समजावण्याचे संबंध पुढेही सुरु राहतील, जेणेकरुन तिचा संसार वाचेल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.