भाजीविक्रीच्या नावाने परिसराची रेकी, नंतर चोरी, सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्याला बेड्या

भाजी विक्रीच्या आडून चोरी करणाऱ्या चोरट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे (Vegetable Vendor theft in Kalyan caught in CCTV).

भाजीविक्रीच्या नावाने परिसराची रेकी, नंतर चोरी, सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्याला बेड्या
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 9:08 PM

ठाणे : भाजी विक्रीच्या आडून चोरी करणाऱ्या चोरट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने कल्याणच्या आडीवली-ढोकळी परिसरात अनेकवेळा चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याला दारुचे व्यसन असल्याने तो दारु पिण्यासाठी चोरी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे (Vegetable Vendor theft in Kalyan caught in CCTV).

कल्याण पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरात काही घरांमध्ये चोरीची घटना घडल्याचं उघडकीस आलं होतं. या प्रकरणात स्थानिक नागरीकांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. लवकरात लवकर चोरट्याला अटक करा, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे (Vegetable Vendor theft in Kalyan caught in CCTV).

मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआाय सुरेश डांबरे आणि पीएसआय अनंत लाम सीसीटीव्हीच्या सहाय्याने या प्रकरणाचा तपास करीत  होते. एका दिवशी पोलीस गस्तीवर असताना एक व्यक्ती त्यांना दिसला. पोलिसांना त्याचं वागणं संशयास्पद वाटलं. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याच्याकडे कटर सापडलं. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता आडीवली ढोकळी चोरी प्रकरणाच्या सीसीटीव्हीत दिसणारा चोरटा हाच होता, ही बाब समोर आली.

संबंधित चोरट्याचे नाव बबन जाधव असून तो इगतपुरीला राहतो. तो दिवसा कल्याण-डोंबिवलीत भाजी विक्रीसाठी यायचा. भाजी विक्री करताना तो परिसरातील घरे हेरून ठेवायचा, त्यानंतर तो त्याठिकाणी जाऊन चोरी करायचा. बबनला दारुचे व्यसन आहे. दारुची नशा भाजी विक्रीच्या पैशातून भागत नव्हती. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा सपाटा लावला होता. या प्रकरणात डीसीपी विवेक पानसरे, एसीपी जेडी मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा हरी चौरे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली आहे. दरम्यान, बबनने अजून किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : उत्तर प्रदेश गजब प्रदेश, चोरीची कार चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या वापरात !

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.