Video : मुलगा वडिलांसोबत पहिल्यांदा शर्यतीत उतरला, तुफान स्पीड, भयानक अपघात, दोघांचाही मृत्यू
हा धक्कादायक अपघात आइल ऑफ मॅन टीटी या शर्यतीदरम्यान झालाय.
नवी दिल्ली : कोणतीही शर्यत (Race) असो अगदी दुचाकीपासून ते चारचाकीपर्यंत, घोड्यांची असो वा बैलगाड्यांची. शर्यतची आवड असणाऱ्यांना कोणतीही शर्यत बघायला आवडतेच. विशेष म्हणजे हे लोक शर्यत पाहण्यासाठी कुठेही जाऊ शकतात. देशात म्हणा किंवा परदेशातही. मात्र, कोणतीही शर्यत खेळणाऱ्यासाठी सोपी नसते. त्यातल्या त्यात गाड्यांच्या शर्यतीमुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहे. यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागलाय. यातच एक बातमी समोर आली आहे. एका शर्यतीत वडील आणि त्यांच्या मुलाला जीव गमवावा लागलाय. हा व्हिडीओ (Video) देखील व्हायरल (Viral) झाला असून जगभरात दुख्ख व्यक्त केलं जातंय. या धक्कादायक प्रकारामुळे अनेकांनी यातून धडा घेतला आहे. दरम्यान, नेमकं प्रकरण काय आहे? हा अपघात कशामुळे झाला? हे जाणून घेऊया.
धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ पाहा
Couple of cheeky waves at Quarterbidge on the overtake between Bryan and Hyde and Blackstock and Rosney ??
हे सुद्धा वाचाSee every polite over take moment on TT+? https://t.co/R8soztpfIy #IoMTT #TTLive #TT2022 #SidecarTT #ThreeWheelingMedia @3WheelingTT pic.twitter.com/kNLIRYkwck
— Isle of Man TT Races (@ttracesofficial) June 10, 2022
नेमकं काय घडलं?
हा धक्कादायक अपघात आइल ऑफ मॅन टीटी (Isle of Man TT Races) या शर्यतीदरम्यान झालाय. या शर्यतीत शुक्रवारी 56 वर्षीय रॉजर स्टॉकटन आणि त्यांचा 21 वर्षीय मुलगा ब्रॅडली याचा साइडकार रेसिंगच्या दुसर्या लॅपदरम्यान मृत्यू झाला. साइडकार रेसिंगमध्ये तीन चाकी बाईक वापरली जाते. त्याचा वेग 260 किमी प्रतितास इतका असू शकतो. रॉजर हा एक अनुभवी रेसर आहे. तर त्याचा मुलगा ब्रॅडलीनं प्रथमच या शर्यतीत भाग घेतला होता. रॉजर आणि ब्रॅडली हे क्रेवे, इंग्लंडचे रहिवासी होते. हा धक्कादायक अपघात आइल ऑफ मॅन टीटी (Isle of Man TT Races) या शर्यतीदरम्यान झालाय.
अनुभवी रॉजरची ही 20वी शर्यत होती
आयल ऑफ मॅन टीटीनं आपल्या निवेदनात म्हटलं की, अत्यंत दु:खानं सांगावं लागत आहे की, वडील-मुलगा रॉजर आणि ब्रॅडली या दोघांचा अपघाती मृत्यू झाला. रॉजर हा अनुभवी टीटी रेसर होता. ही त्याची 20वी शर्यत होती. रॉजरनं 2000 ते 2008 पर्यंत सतत या स्पर्धेत भाग घेतला होता. रॉजरनं 2010, 2017 नंतर या वर्षी या शर्यतीत हजेरी लावली.
या वर्षी पाच जणांचा मृत्यू
एका वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी या स्पर्धेत पाच जणांचा मृत्यू झाला. साइडकार ड्रायव्हर सीझर चॅनेलचाही गेल्या शनिवारी कोर्सवर मृत्यू झाला. रॉजर आणि ब्रॅडली होते. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झालाय. याशिवाय मार्क पर्स्लो आणि डेव्ही मॉर्गन नावाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला आहे. आयल ऑफ मॅन टीटी शर्यत बेटाच्या सार्वजनिक रस्त्यावर होते.