ST Andolan Ajay Gujar Video : एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागतानाचा अजय गुजर यांचा व्हिडीओ व्हायरल, तीनशे रुपयांची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांना पैसे मागतानाचा अजय गुजर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. न्यायालयीन कामकाजाचे नाव सांगून या व्हिडीओमध्ये अजय गुजर हे कर्मचाऱ्यांकडून 300 रुपये मागत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

ST Andolan Ajay Gujar Video : एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागतानाचा अजय गुजर यांचा व्हिडीओ व्हायरल, तीनशे रुपयांची मागणी
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 8:41 AM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे (ST workers) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर आंदोलन काळात एसटी (st) कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. पुण्याच्या स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडेंनी सदावर्ते यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, अजय कुमार गुजर यांच्या सांगण्यावरून आम्ही गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे पैसे जमा केले. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पैसे मागतानाचा अजय गुजर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. न्यायालयीन कामकाजाचे नाव सांगून या व्हिडीओमध्ये अजय गुजर हे कर्मचाऱ्यांकडून 300 रुपये मागत असल्याचा हा व्हिडीओ आहे. टीव्ही 9 मराठी या  व्हायरल व्हिडिओची कोणतीही पुष्टी करत नाही.

अटकेनंतर व्हिडीओ व्हायरल

कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी अजय गुजर यांना अटक केली आहे. अजय गुजर यांना अटक झाल्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अजय गुजर हे एसटी कर्मचाऱ्यांकडे न्यायालयीन कामकाजाचे कारण सांगून पैसे मागताना दिसत आहेत. अजय गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी 300 रुपयांची मागणी केल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्याच्या स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्माचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. स्वारगेट आगारातून एक लाख दहा हजार रुपये जमा करण्यात आले. हे पैसे आम्ही अजय कुमार गुजर यांच्या सांगण्यावरून गुणरत्न सदावर्ते यांना दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. जे कर्मचारी निलंबित होते, त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे चाळीस रुपये तर ज्या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती त्यांच्याकडून तीनशे रुपये जमा केल्याचे मुंडे यांनी म्हटले होते. दरम्यान आता याच प्रकरणातील एक व्हिडीओ व्हायर झाला असून, त्यामध्ये आजय गुजर हे पैसे मागताना दिसत आहेत.  या व्हिडीओने आता खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात “पंजा कसणार की कमळ” फुलणार?

Shivsena on MNS: मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातलंय, शिवसेनेची मनसेसह संघावरही टीका

कसा आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ; आजवर कुठल्या पठ्ठ्यानं गाजवलं कोल्हापूर उत्तरचं मैदान?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.