VIDEO | धपाक धपाक धूम, विरार भाजी मार्केटजवळ फ्री स्टाईल हाणामारी

हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर विरार पश्चिमेच्या महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत (Virar Free Style fighting near Market)

VIDEO | धपाक धपाक धूम, विरार भाजी मार्केटजवळ फ्री स्टाईल हाणामारी
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 11:06 AM

विरार : जागेच्या कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना विरारमध्ये समोर आली आहे. फ्री स्टाईल हाणामारीत महिला जखमी झाली. विरार पश्चिमेकडील भाजी मार्केट परिसरात 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. मारामारीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Virar Free Style fighting near Market)

पोलिसांनी तक्रार न घेतल्याचा आरोप

हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर विरार पश्चिमेच्या महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत एका बाजूचा गुन्हा विरार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र मारहाणीत जखमी झालेल्या महिलेच्या वतीने तक्रार दाखल करुन घेण्यास विरार पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप जखमी महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

शाब्दिक वादाचं पर्यवसन हाणामारीत

विरार पश्चिमेकडील माया निवास भाजी मार्केट परिसरात स्मिता शहा दुपारी 12 वाजता रस्त्याने जात होत्या. स्मिता शाह यांच्या बहिणीचा नवरा प्रकाश ठाकूर आणि त्याच्या कुटुंबीयांनी आशा अनिल पाटील या महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली. शाब्दिक वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मारामारीत आशा पाटील यांच्या पायाला, डोक्याला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर विरार पश्चिमेच्या महालक्ष्मी हॉस्पिटल उपचार सुरु आहेत. घटनेला 24 तास उलटूनही विरार पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. (Virar Free Style fighting near Market)

पाहा व्हिडीओ :

महिला-रिक्षाचालकाची हाणामारी

विरारमध्ये 50 वर्षीय महिला आणि एका रिक्षाचालकाची भर रस्त्यात हाणामारी झाली असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हाणामारीत महिलेने खुलेआम हातात चाकू घेऊन ‘कौन है रे तू?’ म्हणत रिक्षाचालकावर वार केल्याचे स्पष्ट दिसत होते. तर रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या सर्व रिक्षाचालकांसमोर एक रिक्षाचालक महिलेला मारहाण करत असल्याचेही दिसत होते.

संबंधित बातम्या :

नायगावमध्ये हाय प्रोफाइल सोसायटीच्या सभासदांमध्ये मारामारी, दगडाने डोकं फोडलं, मारामारीचा व्हिडीओ व्हायरल

( Virar Free Style fighting near Market)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.