काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकाने ठोकरल्याने वडाळा येथे घरकाम करणाऱ्या महिलेचा मृत्यू
वडाळा दोस्ती एकर परिसरात भरधाव टॅक्सी चालकाने उडविल्याने घरकाम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, या महिलेला तीन लहान मुले असल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई : भरधाव काळ्या – पिवळ्या टॅक्सी चालकाने एका महिलेला जोरदार ठोकरल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वडाळा येथील दोस्ती एकर परिसरात शनिवारी रात्री घडली आहे. यावेळी टॅक्सी चालकाने रस्त्यावरील पार्क केलेल्या वाहनालाही जोरदार धडक दिल्याने दोन वाहनांच्या मध्ये अडकलेल्या या महिलेचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास ती दोस्ती एकर परीसरातून चालली असताना तिला भरधाव काळ्या – पिवळ्या ओम्नी टॅक्सीने जोरदार धडक दिली.
वडाळा येथे घरकाम करणाऱ्या सुप्रिया कट्टीमनीगौडर ( वय 35 ) हीला शनिवारी रात्री ती घरकामासाठी जात असताना भरधाव टॅक्सी चालकाने चिरडले. या वेळी तिच्या सोबत चालत असलेली तीन मुले सुदैवाने बचावली. या परिसरात यापूर्वी भरधाव टॅक्सी चालकांच्यामुळे अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. ही महीला घर काम करुन आपाला उदरनिर्वाह करायची.
शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास ती दोस्ती एकर परीसरातून चालली असताना तिला भरधाव काळ्या – पिवळ्या ओम्नी टॅक्सीने जोरदार धडक दिली. ती एका घरात घरकामासाठी जात असताना तिला टॅक्सी चालकाने धडक दिली. टॅक्सी चालकाने तिच्या सोबत रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनालाही ठोकरले आहे. त्यामुळे दोन वाहनाच्या मध्ये अडकून सुप्रिया गंभीर जखमी झाली. ज्यावेळी ती चालली होती, त्यावेळी तिच्या सोबत तीन मुलेही होती त्यांचे प्राण मात्र सुदैवाने बचावले. या प्रकरणात टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली असून त्याची जामीनावर सुटका झाली आहे. या अपघातात या टॅक्सीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यावरून गाडीच्या वेगाचा अंदाज येत आहे. या गाडीची विंड स्क्रीन पूर्णपणे तुटली आहे.
अनेकदा टॅक्सी चालकांकडून अपघात
सुप्रिया हीला तीन मुले असून मोठा मुलगा तेरा वर्षांचा लहान मुलगा तीन वर्षांचा आहे. सुप्रिया ही खूपच मेहनती होती, असे येथील रहीवाशांनी म्हटले आहे. या ठिकाणी शेअर टॅक्सी चालक वेगाने गाड्या चालवित असून अनेकांचे वय खूप कमी असून ते नशेबाजी करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेकदा येथे टॅक्सी चालकांकडून अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे