विद्यार्थ्याचा मृतदेह गाद्यांमध्ये सापडल्यामुळे खळबळ, संशय वाढल्यामुळे पोलिसांचा तपास गतीने…
Wardha Crime News : आश्रम शाळेत एका विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडल्यामुळे संपूर्ण शाळेत संशयाचं वातावरण आहे. मुळात त्या विद्यार्थ्यांचा मृतदेह गादीखाळी लपवून ठेवला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
वर्धा : मुलं ज्या ठिकाणी झोपतात, त्या ठिकाणी गाद्या ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्या गाद्यांच्याखाली एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यामुळे सगळीकडं खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे हा मृतदेह गाद्याच्या खाली कोणी लपवून ठेवला होता, अशी देखील चर्चा आता सुरु झाली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट (Melghat) येथील चिखलदरा (chikhaldara) तालुक्याच्या डोमा येथे घडली आहे. तो विद्यार्थी आश्रम शाळेतील (Ashram School) आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी असा नाराजीचा सूर पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
आश्रमशाळेत १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील तो विद्यार्थी होता अशी माहिती समजली आहे. नारा येथील आदिवासी आश्रमशाळेत १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांसह पालक सुध्दा हादरले आहेत. गाद्यांच्या खाली मृतदेह आढल्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे. यामागे काहीतरी कटकारस्थान असल्याचा पोलिसांना संशय आहे.
त्यांना गादीखाली मृतदेह आढळला
कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व. यादवरावजी केचे नावाची आश्रम शाळा आहे. शिवम सनोज उईके असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील विद्यार्थी होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी झोपण्याकरिता गाद्या काढत असताना त्यांना गादीखाली मृतदेह आढळला आहे.
ज्यावेळी विद्यार्थ्याचा मृतदेह गाद्यांखाली सापडला, त्यावेळी तिथं उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी भयभीत झाले होते. त्यांनी ही गोष्ट तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कानावर घातली. त्यांनतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.