Wardha : ‘मेरे सपने बडे है’ म्हणत 16 वर्षांची मुलगी पळाली! स्वप्न पूर्ण होण्याआधी वर्धा पोलिसांनी घरी आणून सोडलं
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल केला. त्याबरोबर शोधमोहिमेला सुरूवात केली. पोलिसांनी तिची माहिती सर्व जिल्ह्यातील सर्व पोलिसांना दिली.
![Wardha : 'मेरे सपने बडे है' म्हणत 16 वर्षांची मुलगी पळाली! स्वप्न पूर्ण होण्याआधी वर्धा पोलिसांनी घरी आणून सोडलं Wardha : 'मेरे सपने बडे है' म्हणत 16 वर्षांची मुलगी पळाली! स्वप्न पूर्ण होण्याआधी वर्धा पोलिसांनी घरी आणून सोडलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/22145134/wardha-police.jpg?w=1280)
वर्धा – डिजीटल साधन हातात आल्यापासून मुलांना आपण कायतरी वेगळं असल्याचं जाणवत आहे. त्याचबरोबर फॅशनसह (fashion) मोठे स्वप्न बाळगण्याचा फिवर चढलेला पाहावयास मिळत आहे. मोबाईल किंवा इतर माध्यमातून पाहिलेली स्वप्न पुर्ण करण्याच्या नादात ते कोणत्याही थराला जात आहेत. अनेक मुलांनी पबजी सारख्या मोबाईल गेमच्या नादात घर सोडून इतर राज्यात पलायन केलं. परंतु वर्ध्यामधील (Wardha) 16 वर्षीय मुलीन आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी घरातून पलायन केलं होतं. घरातून जाताना तिने एक चिठ्ठी लिहीली होती. संबंधित मुलगी सापल्याने घरच्यांसह पोलिसांनी (Wardha Police)सुटकेचा निश्वास सोडला आहे.
“मेरे सपने बडे है, मै उसे पुरा करने जा रही हूँ,
घरातील एका रूममध्ये चिठ्ठी लिहून “मेरे सपने बडे है, मै उसे पुरा करने जा रही हूँ,” असे लिहून 16 वर्षीय मुलीने पलायन केले होते. याबाबत तिच्या घरच्यांनी वर्धा शहर पोलिसात 20 मे रोजी तक्रार दाखल केली होती. मुलगी घरातील सगळं कुटुंब असताना अचानक दिसेनासी झाली. त्यामुळे घरचे एकदम चिंतेत आले. ते राहत असलेल्या परिसरात सगळीकडे मुलीचा शोध घेतला. परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही. तिच्या घरच्यांनी संपुर्ण घराची झडती घेतली, त्यावेळी त्यांना एक चिठ्ठी आढळून आली. घरच्यांनी चिठ्ठी वाचली असता त्यात इंग्रजीमध्ये “मेरे सपने बडे है उसे पुरा करने जा रही हूँ” असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे घाबरलेल्या घरातील सदस्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.
अमरावती जिल्ह्याच्या मालखेड येथे ती आढळली
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल केला. त्याबरोबर शोधमोहिमेला सुरूवात केली. पोलिसांनी तिची माहिती सर्व जिल्ह्यातील सर्व पोलिसांना दिली.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/30194955/ajit-1-2.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/30193101/yawatmad-bjp-n.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/30193250/Uddhav-Thackeray-11.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/30192137/New-Project-123.jpg)
सगळीकडे पोलिस शोधाशोध करीत असताना अमरावती जिल्ह्याच्या मालखेड येथे काही नागरिकांना ती दिसून आली. तिथल्या नागरिकांनी तिची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी आणि पोलिसांनी तिथून मुलीला ताब्यात घेतले.