Wardha Tiger Attack : वर्ध्यात पुन्हा दहशत! वाघाच्या हल्ल्यात एक ठार, एक गंभीर, तेदुपत्ता संकलनाकरिता गेल्या होत्या महिला
सुशीला भाऊराव मंडारी (वय 60) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे तर अविता रवींद्र मंडारी (वय 27) असे जखमी महिलेचे नाव आहे. या दोन्ही महिला येनी दोडका येथील रहिवाशी आहेत. हे हल्ले रोखण्याचे आव्हान आता स्थानिक प्रशासन आणि वन विभागासमोर असणार आहे.

वर्धा : वर्ध्यातल्या नागझरीत पुन्हा दहशतीचे वातावरण पसरलं आहे. कारण या परिसरात पुन्हा वाघाचे हल्ले (Tiger Attack) वाढले आहे. वाघाच्या दहशतीने पुन्हा नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात पुन्हा या घटानांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा वनपरिक्षेत्रात (Forest) येत असलेल्या नागझरी कंपार्टमेंट या संरक्षित परिसरात तेंदुपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलांवर (Ladies) वाघाने हल्ला केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली. सुशीला भाऊराव मंडारी (वय 60) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे तर अविता रवींद्र मंडारी (वय 27) असे जखमी महिलेचे नाव आहे. या दोन्ही महिला येनी दोडका येथील रहिवाशी आहेत. हे हल्ले रोखण्याचे आव्हान आता स्थानिक प्रशासन आणि वन विभागासमोर असणार आहे.
दोन महिलांवर वाघाचा हल्ला
सुशीला मंडारी आणि अविता मंडारी या दोघी तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता सकाळी नागझरी कंपार्टमेंट संरक्षित वनातील हनुमान मंदिराजवळ गेल्या होत्या. तेंदूपत्ता जमा करत असताना या जंगलामध्ये असलेल्या वाघाने दोन्ही महिलांवर हल्ला केला. त्यामध्ये सुशीला भाऊराव मंडारी ही महिला वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असलेली अविता मंडारी ही महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधोपचार केल्यानंतर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले आहे.




वाघाचे हल्ले पुन्हा वाढले
वाघाने दोन्ही महिलांवर हल्ला केल्याची माहिती परिसरातील तेंदूपत्ता संकलन करीत असलेल्या आकाश भलावी या युवकाला कळताच त्याने ही माहिती गावामध्ये व वन विभागाचे यांना दिली.या परिसरात तेंदुपत्ता संकलनाला ५ मे पासून प्रारंभ करण्यात आला होता. त्याचा 24 मे हा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी ही घटना घडली.आज एकूण 13 लोक तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होतें.वाघाच्या वास्तव्याने शेतकरी हैराण चार दिवसापूर्वी लिंगा येथील शेतकरी महादेव चौधरी यांच्या शेतामध्ये बांधून असलेल्या कुत्र्यावर वाघाने हल्ला केला होता. परंतु, त्या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला. सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी शेतामध्ये सतत काम करत आहेत. त्यामध्ये वाघाची दहशत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली असून मान्सून पूर्व मशागत कशी करावी या विवंचनेने मध्ये शेतकरी सापडलेला आहे. ही विवंचान दूर करण्याची जबाबदारी आता शासनावर असणार आहे.