Washing machine blast : कपडे धुवायचा त्रास वाचवणारी वॉशिंग मशिन जेव्हा जाळ ओकते, प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ

अलिकडच्या काळात वॉशिंग मशिनचा वापर वाढला आहे. मात्र याच वॉशिंगमशीनचा ज्यावेळी ब्लास्ट (Blast) होतो, त्यावेळी काय स्थिती होते. हे दाखवणार एक व्हिडिओ समोर आला आहे.

Washing machine blast : कपडे धुवायचा त्रास वाचवणारी वॉशिंग मशिन जेव्हा जाळ ओकते, प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ
वसईत बॉशिंग मशिनला भयंकर आगImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 6:13 PM

वसई : आपल्यापैकी अनेकांना कपडे धुण्याचे काम सर्वात जास्त जिकीरीचे वाटते. त्यासाठी आपण अधुनिकतेकडे वळतो. आजकाल प्रत्येक घरात वॉशिंग मशीन (Washing machine) दिसू लागल्या आहेत. वॉशिंग मशिनमध्ये कपडे तर लगेच धुऊन होतातच, शिवाय सुकतातही पटकन, त्यामुळे अलिकडच्या काळात वॉशिंग मशिनचा वापर वाढला आहे. मात्र याच वॉशिंगमशीनचा ज्यावेळी ब्लास्ट (Blast) होतो, त्यावेळी काय स्थिती होते. हे दाखवणार एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक यंत्राचा (Electric machine) योग्यरित्या वापर आणि योग्य काळजी न घेतल्यास कााय दुष्परिणाम होतात, ते हा व्हिडिओ पाहिल्यावर कळून येतं. कारण वसईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत वॉशिंग मशीन मध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर घराची आणि वॉशिंगमशीनची झालेली स्थिती प्रत्येकाने पाहवी अशी आहे.

नेमका प्रकार काय घडला?

वसई पश्चिममधील आनंदनगर परिसरातील रणजीत कौर उप्पल यांच्या रो हाऊसमध्ये आज 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकून उप्पल खाली तळ मजल्यावर आल्या होत्या. खाली येताच घरातून धुराचे कल्लोळ बाहेर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावे त्यांनी तात्काळ वर जाऊन, मशीन बंद केली. पण तोपर्यंत मशीन आणि घराचा काही भाग जळाला होता. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यात मोठ्या नुकसानीचा सामाना करावा लागला आहे.

कानडोळा करण महागात

ही आग एवढी भयानक होती की यात घराचा छत, भिंती पूर्ण काळ्या झाल्या आहेत. उन्हाचा कडाका सुरू झाला आहे. त्यामुळे शर्टसर्किटच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे घरातील उपकरण सर्व्हिसिंग करून घ्यावे असे अहवानही करण्यात येत आहे. मात्र आपण अनेकदा वेळकाढूपणा करतो. मात्र याकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते ते हा व्हिडिओ पाहिल्यावर कळतंय. आपला त्रास वाचपणारी उपरण वेळीच योग्यरित्या हातळली नाहीत, तर भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. हे दाखवणारी ही घटना आहे.

शेतकऱ्यांवर संकटाचा फेरा सुरुच; लातूरमध्ये शेतकऱ्याचा ऊस परस्पर विकला, ऊस विकणारे कारखान्याचे कर्मचारी

दरोडेखोराचा फिल्मी स्टाईल पाठलाग, जखमी होऊनही पोलिसाने गचांडी धरलीच, कसारा घाटात थरारनाट्य

Pune Crime | बाथरूममध्ये मोबाईल लपवून शिक्षिकेचे केले चित्रीकरण ; पुण्यात अल्पवयीन मुलाचा प्रताप

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.