इम्तियाजचे सत्तूरने समिनावर सपासप वार! वाचवायचं दूरच, निर्दयी घटनेचा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला गेला थरार

Live Video of Murder : सध्याच्या घडीला कुठेही कोणताही राडा, बाचाबाची, हाणामारी झाली, की काढला मोबाईल आणि सुरु केलं रेकॉर्डिंग अशी बाब सर्रास पाहायला मिळतेय. हातकणंगलेच्या हुपरीत झालेली घटनाही याला अपवाद नव्हती.

इम्तियाजचे सत्तूरने समिनावर सपासप वार! वाचवायचं दूरच, निर्दयी घटनेचा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला गेला थरार
कोल्हापुरात पतीनं केली पत्नीची धारदार शस्त्रानं वार करत हत्या
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 9:51 AM

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder by Husband) केल्याची धक्कादायक घटना 25 जानेवारी रोजी घडली होती. या घटनेचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Live Murder recorded on Mobile Camera is went viral on Social Media) झाला आहे. समिना इम्तियाज नदाफ या महिलेची चारचौघांत धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली असतानाच आता या थरारक घटनेचा धक्कादायक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. इम्तियाज राजू नदाफ असं हत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. या दाम्पत्यामध्ये काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. हाच वाद टोकाला गेल्यामळे इम्तियाजने आपली पत्नी सफिनावर धारदार शस्त्रानं वार करुन तिची हत्या (Murder of Wife) केली. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सध्या या घटनेनं संपूर्ण हातकणंगले तालुका हादरुन गेला आहे. या धक्कादायक घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओदेखील आता समोर आला आहे.

निर्दयी घटना, व्हिडीओ रेकॉर्ड करणारेही निर्दयीच!

सध्याच्या घडीला कुठेही कोणताही राडा, बाचाबाची, हाणामारी झाली, की काढला मोबाईल आणि सुरु केलं रेकॉर्डिंग अशी बाब सर्रास पाहायला मिळतेय. हातकणंगलेच्या हुपरीत झालेली घटनाही याला अपवाद नव्हती. इम्तियाज निर्दयीपणे आपल्याच पत्नीवर सत्तूरनं सपासप वार करत होता. पण लोक तर त्याहीपेक्षा निर्दयी असल्याची भावना व्यक्त केली जाते आहे. जीवघेणा हल्ला केलेल्या पतीच्या तावडीतून समिनाला वाचवण्याचं सोडून उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचं दिसून आलं आहे. यावेळी जीव वाचवण्यासाठी समिनाचा आक्रोश सुरु होता. पण एकही जण तिच्या मदतीसाठी पुढे आला नाही.

चारचौघातच गळा चिरला!

हा सर्व प्रकार घडत असताना समिना यांचे वडील घटनास्थळी होते. डोळ्यांसमोर हा प्रकार घडत असल्यामुळे समिना यांचे वडील आपल्या जावयाला पकडण्यासाठी गेले. मात्र आरोपीने समिनाचे वडील यांच्याही हातावर वार करून त्यांनाही जखमी केले. या हल्ल्यात पत्नी समिना नदाफ यांचा जागेवरच मृत्यू झाला असून त्यांचा पती इम्तियाज यास हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

समिना नदाफ या चिकन 65 चा व्यवसाय करत होत्या. त्या रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चिकन 65 च्या गाड्यावर काम करत असताना तिथे त्यांचा पती दारू पिऊन आला होता. यावेळी नशेत असलेल्या पतीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी घाबरलेल्या पत्नी समिना नदाफ या धावत शेजारील टेलरच्या दुकानात पळत गेल्या. मात्र टेलरच्या दुकानात लपण्यासाठी गेलेल्या समिना यांचा त्यांच्या पतीने पाठलाग गेला. तसेच आपल्याच पत्नीचा गळा चिरून तसेच अंगावर वार करुन समिनाची हत्या केली.

संबंधित बातम्या :

‘आयटम चाहीये, तुझे? हांss..’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला चपलेनं हाणलं

17 किलो सोनं 8 कोटी किंमत, मुंबईतून चोरून राजस्थानात पुरलं, पोलिसांनी पर्दाफाश कसा केला

सासऱ्याचा खून करुन प्रियकरासोबत फरार, महिलेला सात दिवसांत बेड्या, हत्येचं नेमकं कारण काय ?

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.