सफेद हिरे, 18 कॅरेट सोन्याने जडलेले असे आहे 27 कोटीचे ‘हे’ घड्याळ

जप्त करण्यात आलेल्या घड्याळांमध्ये ROLEX, PIAGET आणि JACOB & Co. आदी कंपन्यांच्या घड्याळांचा समावेश आहे. मात्र या सर्व घड्याळांमध्ये आकर्षणाचा विषय ठरले ते 27 कोटींचे घड्याळ.

सफेद हिरे, 18 कॅरेट सोन्याने जडलेले असे आहे 27 कोटीचे 'हे' घड्याळ
असे आहे 27 कोटींचे घड्याळImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 5:08 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indiara Gandhi Internation Airport) सीमा शु्ल्क विभागाने (Custom Department) करोडोच्या किंमतीची घड्याळे जप्त (Expensive Watchs Seized) केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडे 28 कोटी 17 लाख 97 हजार रुपयांहून अधिक किंमतीची घड्याळे आढळली आहेत. मात्र या घड्यांमधील एक घड्याळ सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. हे घड्याळ पाहून तुमचे डोळे दिपल्याशिवाय राहणार नाहीत.

जप्त करण्यात आलेल्या घड्याळांमध्ये ROLEX, PIAGET आणि JACOB & Co. आदी कंपन्यांच्या घड्याळांचा समावेश आहे. मात्र या सर्व घड्याळांमध्ये आकर्षणाचा विषय ठरले ते 27 कोटींचे घड्याळ.

काय आहेत घड्याळाची वैशिष्ट्ये?

हे हिरेजडीत घड्याळ अमेरिकन ज्वेलरी आणि घड्याळ निर्माता जेकब अँड कंपनीच्या मालकीचे आहे. या घड्याळाची किंमत सुमारे 27 कोटी, 9 लाख, 26 हजार 51 रुपये इतकी आहे. हे घड्याळ तयार करण्यासाठी रत्न आणि सफेद सोन्याचा वापर करण्यात आला असून, या घड्याळात सोने आणि हिरे जडले आहेत.

घड्याळात 76 व्हाइट डायमंडचा वापर

जप्त करण्यात आलेल्या या घड्याळाचे नाव आहे Jacob & Co. Billionaire III Baguette White Diamonds 54 x 43 mm watch. या घड्याळावर 76 हिरे जडले असून 18 कॅरेटच्या व्हाईट गोल्डपासून हे घड्याळ बनवण्यात आले आहे.

घड्याळाच्या डायवरही हिरे जडवले आहेत. हे घड्याळ स्वित्झर्लंडमध्ये बनवले असून दोन वर्षांच्या वॉरंटीसह येते. तसेच हे मर्यादित एडिशन घड्याळ आहे.

हे आहे जगातील सर्वात महागडे घड्याळ

ग्राफ डायमंड हैलुसिनेशन (Graff Diamonds Hallucination) कंपनीचे घड्याळ हे जगातील सर्वात महागडे मानले जाते. या घड्याळात 110 कॅरेट रंगीत हिरे जडलेले आहे. या घड्याळाची किंमत सुमारे 400 कोटी रुपये आहे.

या घड्याळाच्या डायलवर विविड यलो, फॅन्सी इंटेन्स पिंक, फॅन्सी इंटेन्स ब्लू, फॅन्सी लाइट पिंक, फॅन्सी लाइट ग्रे ब्लू, फॅन्सी इंटेन्स ब्लू, फॅन्सी ग्रीन आणि फॅन्सी ऑरेंज या रंगात हिरे जडलेले आहेत. याशिवाय अनेक विविध कटमध्ये डिझाईनसह हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.