Birbhum Violence | आमच्या घराला आग लावलेय, तरुणाचा मित्राला फोन; नवदाम्पत्यासह आठ जणांचे कोळसा झालेले मृतदेह सापडले

"आम्हाला एका घरात डांबून आग लावण्यात आली आहे, पोलिसांना पाठवण्याची व्यवस्था कर" असं साजीदूरने सांगितलं. त्यानंतर माहिमने आपल्या वडिलांना याविषयी सांगितलं. मात्र साजीदूरशी पुन्हा फोन करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले.

Birbhum Violence | आमच्या घराला आग लावलेय, तरुणाचा मित्राला फोन; नवदाम्पत्यासह आठ जणांचे कोळसा झालेले मृतदेह सापडले
बीरभूम हिंसाचारात आठ जणांचा मृत्यूImage Credit source: सोशल
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 10:13 AM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम (Birbhum) येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार (West Bengal Violence) उफाळला आहे. संतप्त जमावाने जवळपास डझनभर घरं पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत होरपळून आठ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत 22 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अशातच या अग्निकांडाशी संबंधित हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. बीरभूम हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांमध्ये एका नवदाम्पत्याचाही (Newly Married Couple) समावेश होता.

काय आहे प्रकरण?

शबे-बारातच्या निमित्ताने लिली खातून आपले पती काजी साजीदूर यांच्यासह बगतुई गावातील आपल्या माहेरी आली होती. सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास साजीदूर यांनी आपला मित्र काजी माहिमला फोन केला. साजीदूरचा थरथरणारा आवाज ऐकूनच मित्राला धडकी भरली. ‘आज तक’च्या वेबसाईटवर यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.

तरुणाचा मित्राला फोन

“आम्हाला एका घरात डांबून आग लावण्यात आली आहे, पोलिसांना पाठवण्याची व्यवस्था कर” असं साजीदूरने सांगितलं. त्यानंतर माहिमने आपल्या वडिलांना याविषयी सांगितलं. मात्र साजीदूरशी पुन्हा फोन करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी लिली आणि साजीदूर या दोघांचे जळून कोळसा झालेले मृतदेह आढळले.

या घटनेनंतर साजीदूरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीरभूममधील नानूरला राहणाऱ्या साजीदूरचा विवाह नुकताच मिजारुल शेख यांची कन्या लिली खातूनसोबत झाला होता. जानेवारीत झालेल्या या निकाहानंतर सोमवारी लिली नवऱ्यासह माहेरी आली होती. संध्याकाळपर्यंत सर्वकाही आलबेल होतं, मात्र अचानकच होत्याचं नव्हतं झालं.

‘त्या’ रात्री काय घडलं?

सोमवारच्या रात्री बॉम्बच्या आवाजांनी बोगतुई गावातील ग्रामस्थ दचकून जागे झाले. अनेक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचं त्यांनी पाहिलं. अनेक जणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही बोलवण्यात आलं. मात्र अनेक घरं भस्मसात झाली होती. पोलिसांनी एका घरातून सात मृतदेह बाहेर काढले. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. तर एका गंभीर जखमी व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव तापाने फणफणला, अवघ्या तीन दिवसात कोरोनाने मृत्यू

लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.