काय आहे डिजिटल शोषण प्रकरण, ज्यात 81 वर्षांच्या कलाकारावर लावण्यात आले आहेत आरोप

या प्रकरणात एका ८१ वर्षांच्या कलाकाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार, स्वेच्छेने जखम करणे, धमकी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणातील पीडित तरुणी ही या आरोपीसोबत राहात असलेल्या लिव्ह इन पार्टनरच्या एका कर्मचाऱ्याची मुलगी असल्याचे सांगण्यात येते आहे.

काय आहे डिजिटल शोषण प्रकरण, ज्यात 81 वर्षांच्या कलाकारावर लावण्यात आले आहेत आरोप
delhi digital abuse caseImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:14 AM

नवी दिल्ली दिल्लीला लागून असलेल्या नोएडा परिसरात लौंगिक शोषणाचे (Digital Abuse) एक वेगळेच प्रकरण बाहेर आले आहे. त्यामुळे डिजिटल रेप हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या गुन्ह्याचा २०१३ साली गुन्हेगारी कायद्याच्या संशोधनात आयपीसीत (IPC) करण्यात आला होता. ज्याला निर्भया कायदा (Nirbhaya Law)असेही संबोधण्यात येते. नोएडा प्रकरणात पीडिता जेव्हा १० वर्षांही होती, तेव्हापासून तिच्यावर लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. रविवारी १५ मेपर्यंत ही व्यक्ती तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होती. या प्रकरणात एका ८१ वर्षांच्या कलाकाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार, स्वेच्छेने जखम करणे, धमकी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणातील पीडित तरुणी ही या आरोपीसोबत राहात असलेल्या लिव्ह इन पार्टनरच्या एका कर्मचाऱ्याची मुलगी असल्याचे सांगण्यात येते आहे. २०१५ साली शिक्षणासाठी या दाम्पत्यासोबत राहण्यासाठी पीडितेला पाठवण्यात आले होते. काय आहे डिजिटल रेप प्रकरण

डिजिटल रेप म्हणजे काय

एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे शोषण इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात येत असेल तर त्याला डिजिटल रेप असे संबोधण्यात येत नाही. इंग्रजीत डिजिट या शब्दाचा अर्थ अंक असा होतो. तर इंग्रजी शब्दकोषात त्याचा अर्थ हात, अंगठा, पायाचे बोट अशा शरिरांच्या अंगाला डिजिट असे संबोधले जाते. कायदेतज्ज्ञांच्या मते महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जेव्हा बोटांचा वापर करण्यात येतो. तेव्हा असे लैंगिक शोषण हे डिजिटशी संबंधित असते म्हणून डिजिटल रेप असे संबोधले जाते. कुठल्याही महिलेच्या लैंगिक शोषणासाठी जेव्हा हाताचा किंवा पायांच्या बोटांचा वापर शारिरिक क्रियेत केला जातो, तेव्हा त्याला डिजिटल रेप असे म्हणतात. लौगिंक शोषणाच्या या पैलूचा समावेश २०१३ च्या गुन्हेगारी कायद्याच्या संशोधनात करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

२०१३ सालानंतर केवळ शारिरिक सहवासापर्यंत बलात्काराचा अर्थ मर्यादित राहिलेला नाही. यात महिलेचे तोंड, प्रायव्हेट पार्ट यांच्यात करण्यात आलेला अत्याचार हा बलात्काराच्या श्रेणीत येतो. एखाद्या वस्तूचा वापर बलात्कारासाठी करण्यात आला, तरी त्याचाही समावेश या संज्ञेने बलात्कारात येतो.

कोणत्या सात परिस्थितीत बलात्कार धरण्यात येतो

. जेव्हा त्या व्यक्तीच्या मर्जीविरोधात

. त्या व्यक्तिच्या मर्जीविना

. सहमतीने पण मृत्यू किंवा माराच्या भीतीने केलेला बलात्कार

. तिच्या सहमतीने, तो तिचा नवरा नसताना आणि तिच्या नवऱ्याच्या सहमतीने, आणि ती नवऱ्याला कायदेशीर पती मानत असताना केलेला बलात्कार

. मानसिक अस्वस्थता किंवा नशेच्या अमलाखाली, त्याचे परिणाम माहित नसताना तिने सहमती दिली असली तरी तो बलात्कारच मानण्यात येतो.

. अठरा वर्षांखालील मुलीसोबत तिची संमती असताना वा नसतानाही केलेला प्रकार हा बलात्कारच

. जेव्हा ती सहमती दाखवण्यास असमर्थ असेल.

पॉक्सो कायद्यात काय आहे तरतूद

नोएडात जे डिजिटल रेपचे प्रकरण समोर आले आहे, त्यात आरोपींच्याविरोधात पीडितेच्या शरिरात बोटं टाकण्याचा आणि त्यात फेरफार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. पॉस्को कायद्यांतर्गतही याबाबत व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. यात अ. आरोपीने मुलाच्या तोंडात वा प्रायव्हेट पार्टमध्ये जोरात बलात्कार केल्यास वा इतर कुठल्या व्यक्तीशी असे करण्यासाठी सांगितल्यास

. जर त्याने एखादी वस्तू वा शरिराचा इतर भाग मुलाच्या कोणत्याही प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला, वा दुसऱ्या व्यक्तीशी असे करण्यास सांगितले

. मुलाच्या कोणत्याही भागात फेरफार केल्यास, ज्यामुळे बलात्कार शक्य होईल, वा दुसऱ्यास असे करण्यास सांगणे

. मुलाच्या प्रायव्हेट भागाला तोंड लावल्यास वा इतर कुणाला सांगितल्यास

असे करणाऱ्यास पॉक्सोच्या नियमन ३ नुसार दोषी आढळल्यास ७ वर्षांची शिक्षा वा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. गंभीर लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत १० वर्षांपासून आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ज्यात पीडीत मुलाचे वा मुलीचे वय १२ वर्षांच्या कमी असेल, त्यांच्यावर हल्ला वा सातत्याने हे कृत्य केल्यास मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे.

पॉक्सो कायद्याच्या अधिनियम सात अंतर्गत एखाद्या मुलाच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावणे हा लैंगिक हल्ला मानण्यात येतो. यात किमान ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.