मालकीणीला कोणी मारले ? पोपटाने दिली साक्ष, नऊ वर्षांनंतर दोघांना जन्मठेप

पोलीसांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी करताना पिंजऱ्यातील पोपट काही तरी बडबडत होता. त्याच्या त्या कर्कश्य आवाजात माग पोलीसांनी घेतला.

मालकीणीला कोणी मारले ? पोपटाने दिली साक्ष, नऊ वर्षांनंतर दोघांना जन्मठेप
PARROTSImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 4:30 PM

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एका महिलेची ती घरी एकटी असताना चोरीच्या उद्देश्याने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात महिलेच्या पाळीव कुत्र्याला देखील संपविण्यात आले होते. मालका मुलासोबत एका लग्नात गेले होते, घरी परतले तर त्यांची पत्नी आणि कुत्रा निपचित पडले होते. या प्रकरणात आता नऊ वर्षांनी दिल्ली सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. पण खटला कसा उभा राहीला हे मोठे मनोरंजक आहे.

20 फेब्रुवारी 2014 रोजी आग्राच्या रहिवासी विजय शर्मा आपल्या मुला सोबत फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते. जेव्हा रात्री उशीरा ते घरी परतले तर त्यांची पत्नी नीलम हीचा देह निपचित पडला होता. समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांचा पाळीव कूत्रा देखील शेजारीच मृतावस्थेत पडला होता. त्यानंतर त्यांनी पोलीसांनी कळविले. पोलीसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला.

पोस्टमोर्टेममध्ये महिलेच्या शरीरावर 14 वार झाले होते. तर कुत्र्यावर 9 वार करण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत होती परंतू कोणताही धागा सापडत नव्हता. पोलीसांनी सांगितले की, घटनास्थळाची पाहणी करताना पिंजऱ्यातील पोपट काही तरी बोलत होता. त्याच्या त्या कर्कश्य आवाजात माग पोलीसांनी घेतला. आणि पोलीसांना संशय आला की हा नेमके काय बोलत आहे. ज्यावेळी त्यांनी नीट ऐकले तेव्हा तो.. ‘आशु आया था’..’आशु आया था’, असे पोलीसांना सांगत होता. ज्यावेळी या आशु कोण आहे याचा धाडोंळा घेतला सर्व प्रकरणाचा उलगडा होत गेला.

पोलिसांनी आशु याचा शोध घेतला असता त्याने सुरूवातीला काही ताकास सूर लावू दिला नाही, परंतू पोलीसांनी जेव्हा चौदावे रत्न दाखविले तेव्हा तो सूता सारखा सरळ झाला. आणि बोलू लागला. आशुतोष हा मालकीण नीलम याचा भाचाच असल्याचे उघडकीस आले. आशुतोष आणि रॉनी यांनी मिळून नीलम यांना दागिन्यांसाठी संपविल्याचे उघडकीस आले.

मालक विजय शर्मा यांनी पोलीसांना पोपट नेमके काय बोलत आहे ते सांगितले. पोलिसांनी देखील या पोपटाशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विजय शर्मा यांनी देखील पोपटाची भाषा नीट विशद करून पोलीसांना सांगितली. त्यानंतर आशुतोष आणि रॉनीला पकडण्यात आले. त्यानंतर या दोघांवर कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलीसांनी आरोपपत्रात पोपटाच्या बडबडीचा साक्ष म्हणून समावेश केला. परंतू कोर्टाने ही साक्ष ग्राह्य मानली नाही. कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर नऊ वर्षे ही केस चालली, त्यानंतर गुरूवारी या केसचे निकालपत्र वाचण्यात आले.

सरकारी पक्षाने कुत्र्याने केलेल्या जखमांचा उल्लेख

कुत्रा आपल्या मालकावर कोणी हल्ला करीत असेल तर सहसा शांत बसत नाही , तो प्राणपणाने प्रतिकार करणारच. या घटनेत आशुतोष गोस्वामी याला कुत्र्याला चावल्याच्या गंभीर जखमा झाला होत्या. त्यामुळे कोर्टाने ही बाब लक्षात घेतली, नीलम यांचा पाळीव कुत्रा स्वामीभक्त होता. त्याने आरोपींना जोरदार प्रतिकार केला होता. कुत्र्यावर वार करून त्याला ठार करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी भाचा आशुतोष गोस्वामी याच्या अंगावर कुत्रा चावल्याच्या गंभीर जखमा झाल्या होत्या.

कोरोनाकाळात वडीलांचा मृत्यू , मुलींनी लढली केस

अजय शर्मा यांचा कोरोनाकाळात मृत्यू झाला. तरी त्यांच्या मुलींनी खंबीरपणे आईचा खटला कोर्टाच्या तारखांना हजर राहून शेवटपर्यंत चालविला. खटल्यात सरकारी पक्षाने 14 साक्षीदार सादर केले. तर बचावपक्षाने केवळ एकच साक्षीदार हजर केला. कोर्टाने उपलब्ध पुराव्यानूसार भाचा आशुतोष आणि रॉनी यांना जन्मठेप सुनावली. सरकारी पक्षाचे महेंद्र दीक्षित यांना सांगितले की विशेष सत्र न्यायाधीशांना आरोपी आशुतोष गोस्वामी आणि रॉनी मॅसी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.