लग्नाच्या वाढदिवशी पत्नीचे पतीला अनोखे गिफ्ट, दागिने विकून दिली हत्येची सुपारी, कारण काय?

त्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस होता. सर्व जोडप्यांप्रमाणे त्यांनी देखील हा दिवस खास पद्धतीने साजरा केला. सेलिब्रेशनची पद्धत उघड होताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.

लग्नाच्या वाढदिवशी पत्नीचे पतीला अनोखे गिफ्ट, दागिने विकून दिली हत्येची सुपारी, कारण काय?
लग्नाच्या वाढदिवशीच पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 8:43 AM

कोरबा : लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्वाचा असतो. हा दिवस खास बनवण्यासाठी जोडपं उत्साही असतात. छत्तीसगडमधील एका महिलेनेही लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने विस्मरणीय केला आहे. महिलेने लग्नाच्या वाढदिवशीच सुपारी देऊन पतीची हत्या केली आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या 24 तासात पोलिसांनी हत्येचा उलगडा करत पत्नीसह दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून हत्येत वापरलेले हत्यार, रक्ताने माखलेले कपडे, चपला आणि बाईक जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुपारीचे पैसे देण्यासाठी महिलेने आपले दागिने विकले. घटना उघड होताच पोलिसही हैराण झाले.

पती रोज छळ करायचा

पती दररोज छळ करायचा. लग्न झाल्यापासून नवरा नेहमी दारू पिऊन मारहाण करायचा. या छळाला कंटाळून महिलेने पतीचा कायमचा काटा काढायचे ठरवले. यासाठी तिने आपल्या ओळखीच्या तुषार सोनी उर्फ ​​गोपीशी संपर्क साधला. मग पैशाचे आमिष दाखवून पती जगजीवन राम रात्रे याची हत्या करण्यास प्रवृत्त केले. दागिने विकून तिने सुपारीचे पैसे गोळा केले. पतीच्या हत्येसाठी आरोपींना 50 हजार रुपये अॅडव्हान्स पण दिला.

घटनेची माहिती कोरबा येथे दाखल झाले. पोलिसांनी एक पथक तयार केले. सायबर सेल, फॉरेन्सिक एक्स्पर्ट बिलासपूर, श्वान पथकासह पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. जगजीवन राम रात्रे याची पत्नी धनेश्वरी रात्रे हिची चौकशी केली. मात्र ती वारंवार आपला जबाब बदलत होती आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने त्याचा काटा काढल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. यानंतर पोलिसांनी पत्नीसह दोघांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.