आधी लहान मुलाच्या मदतीने पतीला संपवले, मग मोठ्या मुलाला गुन्ह्यात फसवले, नेमकं प्रकरण काय?

जमिनीवरुन दररोज घरात वाद व्हायचे. या वादाला महिला कंटाळली होती. मग तिने जे केले त्यानंतर अख्खा गाव हादरला.

आधी लहान मुलाच्या मदतीने पतीला संपवले, मग मोठ्या मुलाला गुन्ह्यात फसवले, नेमकं प्रकरण काय?
जमिनीच्या वादातून मुलाच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 11:31 AM

विदिशा : हल्ली कुठल्याच नात्यात विश्वास राहिला नाही. आपल्या स्वार्थासाठी कोण कुणाचा कसा घात करेल सांगू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून पत्नीनेच लहान मुलाच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना विदिशा जिल्ह्यात घडली. यानंतर महिलेने मोठ्या मुलावर हत्येचा आरोप करत त्याला तुरुंगात पाठवले. टीकाराम साहू असे 65 वर्षीय मयताचे नाव आहे. अखेर महिलेचा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे. आरोपींनी पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

काय आहे प्रकरण?

साहू कुटुंबीयांमध्ये जमिनीवरुन अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. याच वादाला कंटाळून महिलेने पतीच्या हत्येचा कट रचला. यासाठी तिने छोट्या मुलाची मदत घेतली. आरोपींनी 8 जुलै रोजी टीकारामच्या हत्येचा कट अंमलात आणला. पत्नी रामप्यारी बाईने टीकारामचे हात पकडले. मग छोटा मुलगा ताराचंदने कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. हत्येनंतर मोठा मुलगा कमलवर हत्येचा आरोप केला. यानंतर कमलची वडिलांच्या हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात रवानगी झाली.

पोलिसांनी हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असता साक्षी पुराव्यावरुन संशय आला. यानंतर पोलिसांनी मयताच्या पत्नीला आणि छोट्या मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपींनी अखेर सत्य उलगडले. यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. घटना उघडकीस येताच सर्वांनाच धक्का बसला. जमिनीसाठी पतीच्या जीवावर उठणाऱ्या आणि स्वतःच्याच मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या महिलेविरोधात संताप व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.