तो चहा नव्हताच विष होतं, मरणाच्या दारात असताना त्यानं जे केलं तोच ठरला महत्वाचा पुरावा, काय केलं?

जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांच्या विरोधात जाऊन तरुणाने आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले. मात्र घरच्यांच्या विरोधात जाणे त्याला महागात पडले.

तो चहा नव्हताच विष होतं, मरणाच्या दारात असताना त्यानं जे केलं तोच ठरला महत्वाचा पुरावा, काय केलं?
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 3:20 PM

रिवा : मध्य प्रदेशात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. या संबंधात पती अडथळा ठरत होता, म्हणून पत्नीने पतीचा काटा काढल्याची घटना मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात घडली आहे. पण मरणापूर्वी नवऱ्याने बायकोचं बिंग फोडलं. मोबाईलमधील व्हिडिओमुळे पत्नीचा डाव उघड झाला. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. सालिहा परवीन आणि बंटू खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शाहिद खान असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. शाहिद आणि सालिहा यांचा प्रेमविवाह झाला होता.

पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले

शाहिदने घरच्यांच्या विरोधात जाऊन सालिहासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र काही दिवसानंतर साहिलाचे बंटू खानसोबत प्रेमसंबंध जुळले. यामुळे साहिलाला शाहिदला आपल्या मार्गातून दूर करायचे होते. गेल्या महिन्यांपासून साहिला शाहिदला मारण्याचं प्लानिंग करत होती. अखेर तिने ते प्लानिंग यशस्वी केले. तिने शाहिदला चहातून विष दिले.

चहामध्ये विष घालून पतीला मारले

चहा प्यायल्यानंतर शाहिदला ही बाब लक्षात आली आणि आपण वाचणार नाही हे ही कळले. त्यामुळे त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करत पत्नीचे कारनामे सांगितले. तसेच आपल्या मृत्यूला पत्नी साहिला, तिचा प्रियकर बंटू आणि सासू-सासरे जबाबदार असल्याचे म्हटले. चहा प्यायल्यानंतर शाहिदची तब्येत बिघडली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

सासऱ्याने मुलाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहिला

मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच शाहिदचे वडिल रुग्णालयात धावले. त्यांनी शाहिदचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. यानंतर मुलाच्या मृत्यूनंतर पित्याने त्याचा मोबाईल तपासला. यावेळी मोबाईलमध्ये त्यांना एक व्हिडिओ आढळला. या व्हिडिओमध्ये शाहिद आपल्या मृत्यूला पत्नी जबाबदार असल्याचे सांगत होता. तसेच पत्नीने आपल्याला चहात विष घालून दिल्याचे म्हटले होते.

शाहिदच्या पित्याने पोलिसांना हा व्हिडिओ दाखवला आणि सुनेचा भांडाफोड केला. यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबुल केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.