पतीच्या संपत्तीसाठी पत्नीचे हैवानी कृत्य, ‘असा’ झाला गुन्ह्याचा खुलासा
पतीच्या हत्येसाठी पत्नीने मारेकऱ्यांना 65 तोळे सोन्याची सुपारी दिली होती. या सोन्याची बाजारातील किंमत 34 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह अन्य एका आरोपीला अटक केली आहे.
गुरुग्राम : पतीच्या करोडोंच्या संपत्तीसाठी पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील गुरुग्राममध्ये घडली आहे. पतीच्या हत्येसाठी पत्नीने मारेकऱ्यांना 65 तोळे सोन्याची सुपारी दिली होती. या सोन्याची बाजारातील किंमत 34 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह अन्य एका आरोपीला अटक केली आहे. तर महिलेचा प्रियकर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धर्मेश यादव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
धर्मेश गुरुग्राममधील प्रसिद्ध प्रॉपर्टी डिलर होता
धर्मेश हा गुरुग्राममधील प्रसिद्ध प्रॉपर्टी डिलर होता. पालम विहार परिसरात त्याच्या नावावर डझनभर प्लॉट आणि भाड्याच्या मालमत्ता होत्या. गुरुग्राममधील पालम विहार परिसरात एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीत धर्मेशची गोळी झाडून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला.
पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास करत आरोपींना केले अटक
गुन्हे शाखेने हत्येचा तपास करत आरोपी मोईनुद्दीन आणि नीतूला अटक केली आहे. तर नीतूचा प्रियकर बबलू खान याचा शोध सुरू आहे. नीतूला अटक केल्यानंतर तिची चौकशी केली असता सुरवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र मोईनुद्दीनला अटक केल्याचे सांगताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
मोलकरणीमार्फत झाली होती नीतू आणि बबलूची ओळख
गुरुग्राममधील प्रॉपर्टी डीलर धर्मेशची पत्नी नीतूने आपल्या घरी एक मोलकरीण ठेवली होती. या मोलकरणीनेच नीतूची संभळ येथील बबलू खान नावाच्या तरुणाशी भेट घालून दिली होती. नीतू आणि धर्मेश यांच्यात संबंध चांगले नव्हते.
काही भेटीनंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. यानंतर नीतू आणि बबलू खान यांनी प्रॉपर्टी डीलर धर्मेशची करोडोंची मालमत्ता हडप करण्याचा कट रचला. यासाठी नीतूने 65 तोळे सोन्याची सुपारी देऊन पतीची हत्या केली.