Wife Murder | अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद, अखेर पतीनेच पत्नीला संपवलं, कोल्हापुरात खुनाचा थरार
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder by Husband) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ असे मृत महिलेचे नाव असून इम्तियाज राजु नदाफ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. या दाम्पत्यामध्ये काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता.
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder by Husband) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ असे मृत महिलेचे नाव असून इम्तियाज राजु नदाफ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. या दाम्पत्यामध्ये काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. हाच वाद टोकाला गेल्यामळे पतीने पत्नीचा वार करुन थेट खून केला (Murder of Wife). सध्या पतीला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
पत्नीचा पाठलाग करत धारदार शस्त्राने हत्या
मिळालेल्या माहितीनुसार समिना नदाफ या चिकन 65 चा व्यवसाय करत होत्या. त्या रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चिकन 65 च्या गाड्यावर काम करत असताना तिथे त्यांचा पती दारू पिऊन आला. यावेळी नशेत असलेल्या पतीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी घाबरलेल्या पत्नी समिना नदाफ या धावत शेजारील टेलरच्या दुकानात पळत गेल्या. मात्र टेलरच्या दुकानात लपण्यासाठी गेलेल्या समिना यांचा त्यांच्या पतीने पाठलाग गेला. तसेच आपल्याच पत्नीचा गळा चिरून तसेच अंगावर वार करुन त्याने खून केला.
गळा चिरून पत्नीला संपवलं
हा सर्व प्रकार घडत असताना समिना यांचे वडील घटनास्थळी होते. डोळ्यांसमोर हा प्रकार घडत असल्यामुळे समिना यांचे वडील आपल्या जावयाला पकडण्यासाठी गेले. मात्र आरोपीने समिनाचे वडील यांच्याही हातावर वार करून त्यांनाही जखमी केले. या हल्ल्यात पत्नी समिना नदाफ यांचा जागेवरच मृत्यू झाला असून त्यांचा पती इम्तियाज यास हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हत्याचे नेमके कारण काय ?
दरम्यान, रहदारीच्या ठिकाणी गळा चिरून हत्या केल्यामुळे हातकणंगले येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केले असले तरी त्याने पत्नीची हत्या नेमकी का केली, असा प्रश्न विचारला जात आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून नेमका कोणता वाद होता असा प्रश्नदेखील पोलीस तसेच सामान्यांना पडला आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यातच आहेत.
इतर बातम्या :
अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले, वाटेत ट्रकची मागून धडक, कारमध्ये लहान बाळ होतं, त्याचं काय झालं?
पेट्रोल अंगावर टाकत महिलेनं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वाचवलं!