प्रसिद्ध रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना माझं लैंगिक शोषण, एअर हॉस्टेसचा खळबळजनक आरोप
एका एअर हॉस्टेसने अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयात तिचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पीडितेच स्टेटमेंट कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आलं आहे. तिने लीगल एडवायजरला सोबत घेऊन पोलिसात तक्रार केली.

हरियाणा गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका एअर हॉस्टेसने पुरुष स्टाफवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलीसात या संबंधी तक्रार नोंदवण्यात आलीय. तक्रार नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. पीडित एअर हॉस्टेसचा आरोप आहे की, जेव्हा ती व्हेटिंलेटरवर होती, तेव्हा रुग्णालयाच्या मेल स्टाफने तिच्या प्रायवेट पार्टला स्पर्श केला.
या प्रकरणाची चौकशी करु, असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. रुग्णालयाकडून एक पत्र जारी करण्यात आलं आहे. पोलिसांना पूर्ण सहकार्य करु असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. अजूनपर्यंत कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी पोलिसांना देण्यात आलं आहे. गुरुग्राम पोलिसांनी सांगितलं की, पीडितेच स्टेटमेंट कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आलं आहे. पोलिसांची टीम रुग्णालयाच सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. लवकरच आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात येईल.
ते खूप प्रसिद्ध हॉस्पिटल
पीडित एअर हॉस्टेसचा आरोप आहे की, ज्यावेळी तिच्यासोबत ही वाईट कृती करण्यात आली, त्यावेळी ती अर्ध बेशुद्धवस्थेत व्हेटिंलेटरवर होती. पण तिला संवेदना जाणवत होत्या. ती विरोध करण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर तिने पतीला या बद्दल माहिती दिली. त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. ज्या हॉस्पिटलच्या मेल स्टाफवर महिलेने आरोप केलाय, ते खूप प्रसिद्ध हॉस्पिटल आहे.
स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत असताना तब्येत बिघडली
पीडिता पश्चिम बंगालची राहणारी आहे. ती एका एअरलाइन्स कंपनीत नोकरी करते. कंपनीकडून ती ट्रेनिंगसाठी गुरुग्राम येथे आली होती. शहरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ती उतरली होती. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत असताना अचानक तिची तब्येत बिघडली. उपचारासाठी ती 5 एप्रिलला गुरुग्रामच्या या प्रसिद्ध रुग्णालयात दाखल झाली.
पीडित महिलेने अजून काय म्हटलं आहे?
आरोपानुसार, 6 एप्रिलला ती अर्ध बेशुद्धावस्थेत व्हेंटिलेटरवर होती. याचवेळी एका मेल स्टाफच्या तिच्या प्रायवेट पार्टला स्पर्श केला. त्यावेळी मेल स्टाफसोबत दोन महिला सुद्धा होत्या. अर्ध बेशुद्धावस्थेत असल्यामुळे ती विरोध करु शकली नाही. 13 एप्रिलला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तिने हा सगळा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर तिने लीगल एडवायजरला सोबत घेऊन पोलिसात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर रुग्णालयाच्या अज्ज्ञात स्टाफ विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.