AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला हादरवणारी घटना, लग्नानंतर मुलीच्या सुखासाठी आई-वडिलांनी हुंडा-सोनं दिलं, पण…

महाराष्ट्रात आजही हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जातोय. या छळापाई आजही महाराष्ट्राच्या लेकी स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेताना दिसत आहेत (Woman commits suicide after being tortured by in-laws for dowry in Aurangabad).

महाराष्ट्राला हादरवणारी घटना, लग्नानंतर मुलीच्या सुखासाठी आई-वडिलांनी हुंडा-सोनं दिलं, पण...
हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ, पीडितेची अखेर आत्महत्या, 3 वर्षाच्या मुलाला घेऊन सासरची मंडळी फरार
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:22 AM

औरंगाबाद : महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. या पुरोगामी महाराष्ट्राने अनेक रुढी, अंधश्रद्धांना पायदळी तुडवलं. पण हुंडा ही पद्धत अजूनही नामशेष करण्यात हा पुरोगामी महाराष्ट्र कमी पडताना दिसतोय. कारण आजही महाराष्ट्रात हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जातोय. या छळापाई आजही महाराष्ट्राच्या लेकी स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेताना दिसत आहेत. औरंगाबादेत एका तरुणीने हुंड्यासाठी सासरच्यांकडून सुरु असणाऱ्या छळाला कंटाळून अखेर आत्महत्या केलीय. विशेष म्हणजे तिच्या आई-वडिलांनी लग्नाच्यावेळी सासरच्यांना हुंड्यासह सोनंही दिलं होतं (Woman commits suicide after being tortured by in-laws for dowry in Aurangabad).

नेमकं प्रकरण काय?

सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून औरंगाबादेतील एका महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरची मंडळी पीडितेच्या 3 वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झाले आहेत. याप्रकरणी औरंगाबाद येथील वेदांत नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच मृतक महिलेच्या पतीसह इतर कुटुंबियांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Woman commits suicide after being tortured by in-laws for dowry in Aurangabad).

कांचनचा अखेर टोकाचा निर्णय

चार वर्षांपूर्वी मृतक कांचन हीचा विशाल राठोड नावाच्या तरुणासोबत विवाह झाला होता. कांचनच्या माहेरच्यांनी सासरच्यांना लग्नाच्यावेळी हुंड्यासह  सोनंदेखील दिलं होतं. मात्र, तिच्या सासरच्यांनी लग्नानंतरही आणखी हुंड्यासाठी तगादा लावला. हुंड्यांसाठी सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता. तरीही कांचनने सगळं सहन केलं. कांचनला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. पण सासरच्यांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने अखेर टोकाचा निर्णय घेतला. संबंधित घटना ही 25 जूनला घडली. पीडितेच्या आत्महत्येनंतर तिचा पती विशाल राठोडसह इतर सासरची मंडळी फरार आहेत.

सासरचे पीडितेच्या मुलाला घेऊन फरार

कांचनने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने विष प्राशन केल्याची माहिती तिच्या माहेरच्यांना मिळाली. त्यांनी तातडीने पीडितेला औरंगाबाद येथील एका रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूनंतर सासरचे मंडळी पीडितेच्या तीन वर्षाच्या बाळाला घेऊन फरार झाले. त्यानंतर पीडितेच्या माहेरच्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पती विशाल राठोड याच्यासह सासरच्या तीन जणांविरुद्ध गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.

हेही वाचा : सुरक्षा भिंतीवरुन दरोडेखोर आले, तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल लुटला, 9 आरोपींना बेड्या

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.