खुनी गर्लफ्रेंड, 44 वर्षांच्या महिलेने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला, मग केली हत्या, त्याच्या एका मित्राचाही केला खून

या महिलेने बॉयफ्रेंडच्या मित्रावरही चाकूने हल्ला केला होता. तिच्या बॉयफ्रेंडचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मित्राचा हॉस्पिटलमध्ये उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

खुनी गर्लफ्रेंड, 44 वर्षांच्या महिलेने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला, मग केली हत्या, त्याच्या एका मित्राचाही केला खून
चिठ्ठी लिहून अमरावतीत मुलीची गळफस घेऊन आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:54 PM

मेलबर्न : एका 44 वर्षांच्या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडचा (Boy Friend) प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात (Austrealia) समोर आली आहे. एवढंच नाही तर या महिलेने बॉयफ्रेंडच्या मित्रावरही चाकूने हल्ला केला होता. तिच्या बॉयफ्रेंडचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मित्राचा हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेने ते दोघेही राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये दोघांवरही चाकूने हल्ला केला.

10 वर्षांपासून एकत्र राहत होते.

मेलबर्नमध्ये राहणारी 44 वर्षांची जैसमीन ही 59 वर्षांच्या एम्बेक यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. ऑस्ट्रिलियाच्या एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हे दोघेही गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. हे दोघेही मेलबर्नमध्ये एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते, अशीही माहिती आहे. याच अपार्चमेंटमध्ये या महिलेने दोघांवरही चाकूने हल्ला केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये रक्ताने माखलेली महिला

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही दृश्ये मिळाली आहेत. बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राची हत्या केल्यानंतर, यात महिला किरकोळ जखमी झाली होती. रक्त लपवण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर तिने हाताच्याभोवती शर्ट लपेटून घेतल्याचेही व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे. सीसीटीव्हीत तिच्या शरिरावरील कपडेही योग्य स्थितीत नसल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

कसा केला हल्ला

महिलेने आधी तिच्या बॉयफ्रेंडवर चाकूने हल्ला केला, त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिने त्याचा मित्र सरकिस एबेड याच्यावर हल्ला केला, त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

खुनी गर्लफ्रेंडला अटक

आरोपी महिला जैसमीनला मेलबर्न पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले त्यानंतर तिला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तिने हे कृत्य रागाच्या भरात केले असले तरी नमेके त्यामागचा उद्देश मात्र अद्याप समजू शकलेला नाही.

मृत सरकिस एबेडच्या मुलीची भावूक पोस्ट

या महिलेच्या बॉयफ्रेंडचा मित्र सरकिसच्या मुलीने या घटनेनंतर भावूक पोस्ट लिहिली आहे. आपल्या वडिलांचा अचानक अशा प्रकाराने झालेला मृत्यू यामुळे ती चांगलीच अस्वस्थ झाली आहे. तिने लिहिले आहे की माझे वडील माझे हिरो होते. ते एक चांगले वडील, पती आणि दोस्त होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला फार दु:ख होते आहे. अशी वेळ कुणावरही येवू नये.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.