Mumbai : टिव्ही पाहण्यात गुंग असलेल्या महिलेने मॅगीत टाकला विषारी टोमॅटो, आठ दिवसांनी मृत्यू
टिव्ही पाहताना त्यांनी चुकून विषारी टोमॅटो कसे अन्नात मिसळले. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला. परंतु त्यांना कसं काय संशयित आढळलं नाही.
मुंबई – मालाडमधील (Malad) मालवणी (Malavani) परिसरात एक दुर्देवी घटना घडली आहे. घरात उंदीर अधिक त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांना मारण्यासाठी एका टॅमेटोवरती काही औषध फवारणी केली होती. पण चुकून तो टोमॅटो ठेवलेल्या महिलेने खाल्ला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील इतर कोणीही घरात नव्हते. काही तासांनंतर तिने तिच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला. तिची प्रकृती ढासळू लागल्याने घरी आलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीने शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) दाखल केले. बुधवारी महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. विशेष म्हणजे 20 जुलै रोजी महिलेने उंदरांपासून सुटका करण्यासाठी टोमॅटोवर विषाचा लेप टाकला होता. ज्यावेळी त्यांनी मॅगी खाल्ली त्यावेळी त्यांना अनेक त्रास होऊ लागले.
महिलेवर आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते
रेखादेवी फुलकुमार निषाद (३५) असे मृत महिलेचे नाव असून त्या मालाड पश्चिमेकडील मार्वे रोडवरील पास्कल वाडी येथील रहिवासी होत्या. “रुग्णालयातून घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्याचा जबाबची नोंद घेतली. महिलेवर आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते असे मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव यांनी सांगितले आहे. टिव्ही पाहत असताना कोणती वस्तू जेवन तयार करण्यासाठी घेतली असल्याचे माहित नसल्याने हा प्रकार घडला आहे. राज्यात अनेकदा टिव्ही पाहताना अशा घटना घडल्या आहेत.
महिलेने जबाबात काय सांगितले.
टिव्ही पाहताना त्यांनी चुकून विषारी टोमॅटो कसे अन्नात मिसळले. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला. परंतु त्यांना कसं काय संशयित आढळलं नाही. त्याचबरोबर पोलिसांनी अधिक खात्री करण्यासाठी महिलेच्या कुटुंबांकडे सुध्दा चौकशी केली. त्यांनी सुध्दा काही तक्रार नसल्याचे सांगितले आहे. सगळ्या गोष्टीतून चौकशी पुर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दुर्दैवी मृत्यूची नोंद केली आहे.