भयानक, सहकाऱ्यांकडून विश्वासघात, महिलेला मारहाण करुन कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार

पीडितेला रविवारी सकाळी मियापूर येथील तिच्या हॉस्टेल जवळून पीकअप केलं. ते यादाद्री येथे साईट विजिटसाठी गेले होते. परतत असताना आरोपींनी रात्री 10.30 च्या सुमारास निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या इमारतीजवळ गाडी थांबवली.

भयानक, सहकाऱ्यांकडून विश्वासघात, महिलेला मारहाण करुन कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 2:19 PM

प्रतिष्ठीत रिअल इस्टेट फर्ममधील दोन सेल्स अधिकाऱ्यांना बुधवारी अटक करण्यात आली. 30 जूनच्या रात्री महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला तिच्या खासगी वसतिगृहाबाहेर सोडलं. सांगा रेड्डी (39) आणि जर्नादन रेड्डी (25) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन उप्पल पोलीस स्टेशनमध्ये झीरो एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मियापूर पोलीस स्टेशनकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. कारण गुन्हा त्यांच्या हद्दीत घडला. हा गुन्हा हैदराबादमध्ये झालाय.

आरोपींनी पीडितेला रविवारी सकाळी मियापूर येथील तिच्या हॉस्टेल जवळून पीकअप केलं. ते यादाद्री येथे साईट विजिटसाठी गेले होते. हैदराबाद येथे परतत असताना आरोपींनी रात्री 10.30 च्या सुमारास निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या इमारतीजवळ गाडी थांबवली. गाडीमध्ये बिघाड झाल्याच कारण आरोपींनी दिलं. आरोपींनी पीडितेला आधी जेवण ऑफर केलं. जर्नादनने तिला सॉफ्ट ड्रींक आणि स्वीट ऑफर केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

पहाटे 3 वाजेपर्यंत महिलेला त्रास दिला

स्वीट खालल्यानंतर महिलेला गुंगी आली, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. दिवसभर काही न खाल्ल्यामुळे चक्कर येत असावी असं पीडित तरुणीला वाटलं. जर्नादनने अजून स्वीट दिल्यानंतर तिला गुंगी चढू लागली. तिच्या त्या अवस्थेचा फायदा घेऊन दोघांनी तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. पहाटे 3 वाजेपर्यंत महिलेला त्रास दिला. आरोपींविरोधात IPC च्या 376 (बलात्कार), 323, 509 (महिलेशी छेडछाड) आणि 420 (फसवणूक) या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.