तांत्रिकाच्या प्रेमात आंधळी झाली, मग स्वतःच्या चार महिन्यांच्या मुलासोबत जे केले ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल !

निर्दयी मातेने तिची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरूनच मुलाला जिवंत ठार केले. मांत्रिकाने महिलेला सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हा पर्याय सुचवला होता. महिला बाबाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की मागचा पुढचा काहीही विचार न पाहता थेट आपल्या पोटच्या मुलाला पूजास्थळी गेऊन गेली.

तांत्रिकाच्या प्रेमात आंधळी झाली, मग स्वतःच्या चार महिन्यांच्या मुलासोबत जे केले ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल !
प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 11:41 PM

सुल्तानपूर : समाज अजूनही अंधश्रद्धेच्या पाशात अडकलेला आहे. उत्तर प्रदेशात घडलेल्या धक्कादायक घटनेतून याची प्रचिती आली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एका महिलेने मांत्रिकाच्या जाळ्यात अडकून आपल्या निरागस मुलाचा जीव घेतला. महिलेचे मांत्रिकासोबत अनैतिक संबंध होते. याच संबंधांमध्ये मांत्रिकाने सांगितल्यानुसार महिलेने पोटच्या मुलाला फावड्याने वार करून ठार केले. सुलतानपूर परिसरात ही खळबळजनक घटना घडली. महिलेने हत्या केलेले निरागस बाळ अवघ्या चार महिन्यांचे होते. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच निरागस बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मांत्रिकाविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.

मनोकामना पूर्ण करण्यासाठी मुलाचा दिला बळी

निरागस बाळाच्या मृत्यूमागील कारण देखील धक्कादायक आहे. निर्दयी मातेने तिची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरूनच मुलाला जिवंत ठार केले. मांत्रिकाने महिलेला सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हा पर्याय सुचवला होता.

महिला बाबाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की मागचा पुढचा काहीही विचार न पाहता थेट आपल्या पोटच्या मुलाला पूजास्थळी गेऊन गेली. त्यानंतर मांत्रिकाने दिलेल्या सूचनेनुसार मुलावर फावड्याने घाव घातले आणि त्याची निर्घृण हत्या केली.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक म्हणजे मुलाला ठार केल्यानंतर त्याला रक्ताच्या थारोळ्यात ठेवून महिलेने त्या जागेवर पूजा उरकली. याच दरम्यान संबंधित घटनास्थळाच्या शेजारून चाललेल्या एका नागरिकाने बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले.

या नागरिकाने आरडाओरड करत परिसरातील इतर नागरिकांना बोलावून घेतले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. अधिक चौकशीतून मांत्रिकाचा प्रताप उघडकीस आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.