एक्स्प्रेसमध्ये महिलांचे व्हिडिओ शुटिंग करायचा, प्रवाशांनी रंगेहाथ पकडले अन्…

पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वच हैराण झाले आहेत.

एक्स्प्रेसमध्ये महिलांचे व्हिडिओ शुटिंग करायचा, प्रवाशांनी रंगेहाथ पकडले अन्...
धावत्या ट्रेनमध्ये महिलेची छेडछाड करणारा अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 11:40 AM

कल्याण / सुनील जाधव : पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये आज पहाटे एका महिलेचा व्हिडिओ काढत छेडछाड करण्याचा प्रकार घडला. महिलेने गोंधळ घातल्यानंतर प्रवाशाने व्हिडिओ काढणाऱ्या इसमाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मोहम्मद अश्रफ असे छेडछाड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलेने आरडाओरडा केल्याने इतर प्रवाशांनी आरोपीला रंगेहाथ पकडले. यानंतर प्रवाशांनी आरोपीला महाप्रसाद दिला.

पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये घडली घटना

सदर महिला सिंहगड एक्सप्रेसने पुण्यावरून मुंबईला आपल्या नातेवाईकासह माहेरी येत होती. यावेळी चालत्या एक्सप्रेस गाडीमध्ये एक व्यक्ती प्रवासादरम्यान तिचा व्हिडिओ बनवत तिला धक्का मारत होता. आरोपी आपल्याशी छेडछाड करत असल्याचे लक्षात आले. बराच वेळ आरोपी हे कृत्य करत होता. अखेर महिला संतापली आणि एक्सप्रेस गाडीमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

प्रवाशांनी आरोपीला चोप दिला

महिलेचा गोंधळ ऐकल्यानंतर डब्यात असलेल्या सर्व प्रवाशांनी व्हिडिओ काढणाऱ्या त्या विकृत प्रवाशाला व्हिडिओ काढताना रंगेहाथ पकडले. मग प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. अखेर ट्रेनमध्ये असलेल्या टीसीने धाव घेत प्रवाशांच्या तावडीतून आरोपीची सुटका केली. यानंतर टीसीने पोलिसांना फोन करून आरोपीच्या पोलिसांच्या स्वाधीन केले.

हे सुद्धा वाचा

आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. सध्या याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.