17 मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्यासाठी महिलेचा स्वत:च्या अब्रूसह खेळ, अशी अडकली स्वत:च्या जाळ्यात
एका महिलेचं धक्कादायक कृत्य पोलीस तपासात समोर आलं आहे. 17 मुलांना फसवण्यासाठी तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं की पोलीस सुद्धा हादरून गेले.
मुंबई : गुन्हेगारी विश्वातील घडामोडींचा आढावा घेतला की, पायाखालची जमीन सरकते. रोज कानावर पडणाऱ्या बातम्या ऐकून अस्वस्थता वाढते. जगात सर्वत्र गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे कोण कधी काय करेल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार इंडिनोशियात घडला. हा प्रकार इतका धक्कादायक आहे की, महिलेच्या षडयंत्रामुळे 17 मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असती. पण वेळीच खुलासा झाल्याने 17 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापूर्वी वाचलं. कारण सदर महिला 17 मुलांना बलात्काराच्या आरोपाखाली फसवण्याच्या तयारीत होती. यासाठी तिने बनवाट सीमेनचा वापर केला होता.
माहितीनुसार, 25 वर्षीय युआनिता सारी अंगग्रेनीने 8 ते 15 वर्षे वयोगटातील तब्बल 17 मुलांना फसवण्यासाठी षडयंत्र रचलं होतं. तिने पहिल्यांदा प्लेस्टेशन बिझनेसचा बहाणा तयार केला. प्लेस्टेशन भाड्यानं देण्याबाबत मुलांना फूस लावली.
पोलीस तपासात ही बाब उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युआनितानं 8 मुलांसोबत रेप केला होता. तेव्हा तिने आपल्या शरीरावरील ओरबडल्याच्या खुणा दाखवत मुलांनी रेप केल्याचं भासवलं होतं. त्यानंतर तिने पोलिसांना सीमेनचा नमुना दिला होता. तसेच ज्या मुलाने रेप केला त्याचं सीमेन असल्याचं तक्रारीत सांगितलं.
पोलीस तपासात असं निष्पन्न झालं की, सीमेनचा नमुना चुकीचा निघाला. इतकंच काय तर तिने दिलेला नमुना सीमेन नसल्याचं निष्पन्न झालं आहे. दुसरंच काहीतरी चिकट द्रव्य असल्याचं लॅबोरेटरीतून पुढे आलं.
इतकंच काय तर युआनिताच्या अंगावरील ओरखडेही तिने स्वत:च मारल्याचं सिद्ध झालं आहे. युआनिताला अटक केल्यानंतर पतीने ही गोष्ट मान्य केली आहे. इंडोनेशियात बाल शोषण प्रकरणात 15 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
पतीने पोलिसांना काय सांगितलं?
युआनिताच्या पतीने पोलिसांना सांगितलं की, तिने मला धमकी दिली होती. त्यांच्यासोबत संबंध बनवून दिले नाही तर छोट्या मुलांचे तुकडे करण्याचा धमकी दिली होती. युआनिताने 12 आणि 14 वर्षांच्या दोन मुलांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले होते. दोन्ही मुलांना अडकवण्यासाठी त्याना मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म दाखवले.