AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती जेलमध्ये अन् बॉयफ्रेंड बेडरूममध्ये, दोघांना एकत्र पाहिल्यावर सासरच्यांनी …

पती तुरूंगात जाताच महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमप्रकरण सुरू झाले. घरातील खोलीत दोघांना एकत्र पाहिल्यावर सासरच्या लोकांनी जे पाऊल उचललं.

पती जेलमध्ये अन् बॉयफ्रेंड बेडरूममध्ये, दोघांना एकत्र पाहिल्यावर सासरच्यांनी ...
| Updated on: Jul 08, 2023 | 2:39 PM
Share

रांची : पती तुरुंगात जाताच महिलेचे दुसऱ्या तरूणाशी प्रेमसंबंध (extra marital affair)सुरू झाले. दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत असत. मात्र तिच्या सासरच्या लोकांनी त्या दोघांना बेडरूममध्ये एकत्र पाहिले असता त्यांनी गळा आवरून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

झारखंडच्या लातेहार येथील हे खळबळजनक वृत्त असून महिलेची हत्या केल्यावर तिचा मृतदेह वर लटकवू गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दर्शवले. मृत महिलेचा नवरा तुरुंगात गेल्यावर ती दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली होती. आणि तिच्या सासरच्या लोकांनी त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. ते पाहून संतापलेल्या लोकांनी तिची हत्या केल्याचे समजते.

लातेहारच्या चांदवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सासरच्या तिघांना अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या नातेवाईकांनी लेखी तक्रार दिली आहे. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती सासरच्या मंडळींनी दिल्याचे त्यांनी सांगितले. पण खरं काय ते कळल्यानंर आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे. मृत महिलेची तिच्याच सासरच्या लोकांनी हत्या करून तिचा मृतदेह फासावर लटकवल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत महिलेच्या पतीला एका जुन्या मारहाणीच्या गुन्ह्यात तुरुंगात जावे लागले होते. पती तुरुंगात जाताच ती महिला गावातीलच एका तरुणासोबत फ्लर्ट करू लागली. दोघेही गुपचूप भेटत असत. दरम्यान, 1 जुलैच्या रात्री कुटुंबीयांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यानंतर त्यांनी महिलेचा तिथेच गळा आवळून खून केला. मात्र तिने आत्महत्या केल्याचे दर्शवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्याबद्दल अपप्रचारही करण्यात आला.

मात्र आपली मुलगी अशी नसल्याचे तिच्या माहेरच्यांचे म्हणणे आहे. मुलीला मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.