धक्कादायक, पुण्यात शिक्षिकेने शाळेतच दहावीच्या मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध

आरोपी शिक्षिकेनेच तिच्या विद्यार्थ्याच लैंगिक शोषण केलं. या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला असून संबंधित शिक्षिकेला अटक झाली आहे. पुण्यातील या खळबळजनक घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

धक्कादायक, पुण्यात शिक्षिकेने शाळेतच दहावीच्या मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध
क्राईम न्यूजImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 11:22 AM

शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि शिक्षक म्हणजे गुरु. विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थी त्यांच्या घरापासून लांब म्हणजे शाळेत असतात, तेव्हा शिक्षकच त्यांचे पालक असतात. शिक्षकांवर विद्यार्थ्यांची जबाबादारी असते. त्यांना योग्य मार्ग दाखवणं, देशासाठी एक चांगला नागरिक म्हणून तयार करणं ही शिक्षकांची जबाबदारी असते. पण काहीवेळा शिक्षकांना आपल्या या जबाबदारीचा विसर पडते. पुण्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षिकेनेच आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपी शिक्षिकेनेच तिच्या विद्यार्थ्याच लैंगिक शोषण केलं. या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला असून संबंधित शिक्षिकेला अटक झाली आहे. लैंगिक प्रकरणात बालकांच संरक्षण करणाऱ्या 7,9, 11, 6, 12, 14 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार शाळेच्या स्टाफ रुममध्ये घडला. पुण्यात गंज पेठ भागात ही शाळा आहे. पीडित मुलगा दहाव्या इयत्तेत असून तो प्रिलियम परीक्षेसाठी शाळेत आला होता, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. हा सर्व प्रकार 27 डिसेंबर रोजी घडला.

उत्तेजित करुन स्टाफ रुममध्ये नेलं

आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याला उत्तेजित केलं व आपल्यासोबत स्टाफ रुममध्ये घेऊन गेली. शाळेच्या मुख्याध्यापकांना स्टाफ रुममध्ये सुरु असलेल्या प्रकाराची माहिती मिळताच ते तिथे गेले व रंगेहाथ शिक्षिकेला पकडलं. शाळा व्यवस्थापनाने मुलाच्या कुटुंबियांना या बद्दल कळवलं. त्यानंतर मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.