जंगलात मानवी अस्थी आढळल्याने खळबळ, आयपीएस अधिकारी सुध्दा घटनास्थळी तात्काळ पोहोचले
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभडी आणि बोरगांव जंगल परिसरात मानवी अस्थी आढळल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी आयपीएस दर्जाचे अधिकारी सह स्थानिक पोलीस निरिक्षकांनी धाव घेत पाहणी केली.
यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यात जंगलात मानवी अस्थी आढळून आल्याने मोठी खळबळ माजली आहे. सापडलेली अस्थी नेमकी कुणाची याचा पोलिस शोध घेत आहेत. कारण तिथं गेल्यावर्षी एक अल्पवयीन प्रेमीयुगुल (minor couple) गायब झालं होतं. त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांना शंका आहे. आयपीएस अधिकारी आणि पोलिस निरिक्षक (police officer) घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे. मानवी अस्थी असल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. दाभडी आणि बोरगांव जंगल परिसरात मानवी अस्थी आढळल्याने मोठी खळबळ उडाली.
मग अस्थी कोणाच्या ?
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभडी आणि बोरगांव जंगल परिसरात मानवी अस्थी आढळल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी आयपीएस दर्जाचे अधिकारी सह स्थानिक पोलीस निरिक्षकांनी धाव घेत पाहणी केली. अस्थी कोणाच्या आहेत हे समजल्यानंतर या प्रकरणात आणखी माहिती उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अल्पवयीन प्रेमीयुगुल वर्षभरापूर्वी पळून गेले
दाभडी येथील एका अल्पवयीन प्रेमीयुगुल वर्षभरापूर्वी पळून गेले होते. त्याचा अद्यापही थांबगपत्ता लागलेला नाही. गावलगतच्या जंगलात मानवी अस्थी केस मुलांचे व मुलींचे कपडे व इतर वस्तू आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. वर्षभरापूर्वी दाभडी येथून एक अल्पवयीन प्रेमी युगुल गायब झाले होते. या प्रकरणी मुलीच्या आईने 17 फेब्रुवारी 2022 रोजी पोलिसात मुलगी घरून गेल्याची तक्रार दिली होती.पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वर्षभर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही, याच प्रकरणात संशयित मुलाचे वडील व भावाला पोलिसांनी अटक केली होती. ते दोघेही अडीच महिने तुरुंगात होते, तरीसुद्धा मुलाचा व मुलीचा शोध लागला नाही. एक वर्षानंतर दाभडी आणि बोरगाव जंगलात गायब असलेल्या मुलांचा अचानक मोबाईल आढळला होता. गावातील युवक जनार्दन कांबळे जंगलात मध आणण्यासाठी गेला असता त्याला तो मिळाला मोबाईल गायब असलेल्या मुलाचाच असल्याची खात्री त्याच्या भावाने केली.