टरबुजातून तंबाखू आणि दारु, कोरोनाग्रस्तांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांची शक्कल

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे (COVID hospital Tobacco alcohol watermelon)

टरबुजातून तंबाखू आणि दारु, कोरोनाग्रस्तांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांची शक्कल
यवतमाळमधील कोरोना रुग्णालयात कलिंगडातून तंबाखूसारखे पदार्थ रुग्णांना पुरवल्याचा प्रकार उघड
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 4:54 PM

यवतमाळ : कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना जिभेची तल्लफ भागवण्यासाठी काही दिवसही धीर धरवेना. त्यामुळे त्यांच्या नातलगांनी अक्षरशः जीवाचा आटापिटा केला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी टरबूज-कलिंगड यासारख्या फळांच्या माध्यमातून खर्रा-तंबाखू पार्सल पाठवण्यात येत होता, तर काही जणांना विदेशी मद्यही पुरवण्यात येत होते. यवतमाळमध्ये सुरु असलेला हा प्रकार रुग्णालय प्रशासनाने हाणून पाडला. (Yawatmal COVID hospital relatives send Tobacco and alcohol through watermelon to Corona Patients)

तंबाखू आणि परदेशी दारु पार्सल

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी काही रुग्णांना त्यांच्याच नातलगांनी तंबाखू आणि दारु पुरवली. विशेष म्हणजे या गोष्टी पाठवण्यासाठी नातेवाईकांनी भलतीच शक्कल लढवली.

टरबूज फोडून पदार्थांचा पुरवठा

टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शौकिनांची तल्लफ भागवण्याचा रुग्णांच्या नातलगांचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने हाणून पाडला. वैद्यकीय महाविद्यालयात तैनात सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कनेने हा प्रकार उघडकीस आला.

रुग्णालयाने प्रयत्न हाणून पाडला

कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातलगांनी हा अजब प्रकार केला. मात्र शौकिनांची तल्लफ डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांमुळे पूर्ण झाली नाही. (COVID hospital Tobacco alcohol watermelon)

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे डोळे होतायत खराब, ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम! वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या महिलेचा विनयभंग; वैद्यकीय कर्मचाऱ्याला अटक

(Yawatmal COVID hospital relatives send Tobacco and alcohol through watermelon to Corona Patients)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.