प्रेम प्रकरणातून टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, या हिंदी मालिकेने दिली होती ओळख

ये रिश्ता क्या कहलाता है, आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृत या सारख्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केली.

प्रेम प्रकरणातून टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, या हिंदी मालिकेने दिली होती ओळख
वैशाली ठक्कर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 9:00 PM

इंदूर,  टीव्ही मालिका अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar Suicide) हिने इंदूर येथे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण प्रेमप्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. वैशालीने टीव्ही मालिका “ये रिश्ता क्या कहलाता है” (yeh rishta kya kehlata hai) आणि बिग बॉस सारख्या अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. वैशाली एक वर्षापासून इंदूरमध्ये (Indore) राहत होती अशी माहिती आहे. आत्महत्येची माहिती मिळताच तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास तेजाजी नगर पोलीस करत आहेत.

वैशालीला मिळाला आहे गोल्डन पेटल पुरस्कार

वैशाली ठक्कर ही मूळची इंदूरची असून, ती एका व्यापारी कुटुंबातील आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली. 2015 मध्ये, तिला स्टार प्लस शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये संजनाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या टेलिव्हिजन शोमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोनंतर ती ये वाद रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृतमध्ये दिसली.

ससुराल सिमर का मधील अंजली भारद्वाज ही वैशालीची सर्वात लोकप्रिय भूमिका होती. ज्यासाठी तिला गोल्डन पेटल अवॉर्ड्समधील नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. 2019 मध्ये, वैशाली टीव्ही शो मनमोहिनीमध्ये दिसली. ज्यामध्ये तीने मानसीची भूमिका साकारली आहे. वैशालीने टेलिव्हिजनशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हे सुद्धा वाचा

वैशालीचे कुटुंब महिदपूरचे रहिवासी

. “ये रिश्ता क्या कहलाता है” या टेलिव्हिजन मालिकेतून वैशालीला टेलिव्हिजनवर पहिला ब्रेक मिळाला. वैशालीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. 2017 मध्ये, तिला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी कलर्स गोल्डन पेटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैशाली ही मूळची उज्जैनमधील महिदपूरची आहे.

चित्रपट कलाकाराने अशा प्रकारे आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने आयुष्याची लढाई हरले आहेत. आता पोलीस तपासात काय वास्तव समोर येते हे पाहावे लागेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.