स्टँडवरची ओळख, रूमवर नेत तिच्यासोबत ठेवले शरीर संबंध, 11 महिने हेच चालू अन् एक दिवस त्याने…
कधी कोण मैत्री करून तुमचा विश्वास घात करून फसवणूक करेल काही सांगता येत नाही. असच एक प्रकरण समोर आलं असून त्यामध्ये आरोपीने पीडित तरूणीची फसवणूक करत तिला सिनेमामधील व्हिलनलाही लाजवेल असा धोका दिला आहे.
Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून अनेक लव्ह स्टोरीज तुम्ही पाहिल्या असतील. म्हणजे आधी ओळख, मैत्री, प्रेम आणि धोका अशीही प्रकरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे सर्वांनी सावध असायला हवं कारण तुम्हालाही समजणार नाही की, कधी कोण मैत्री करून तुमची फसवणूक करेल काही सांगता येत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं असून त्यामध्ये आरोपीने पीडित तरूणीची फसवणूक करत तिला सिनेमामधील कथेतील व्हिलनलाही लाजवेल असा धोका दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पीडित तरूणीची 2022 मध्ये सोशल मीडियावर अनिकेत जाटव याच्यासोबत ओळख होते. दोघांची पहिली भेट ही ग्वाल्हेर बस स्टँडवर होते. या भेटीनंतर दोघांची चांगली मैत्री झाली, रोज एकमेकांसोबत बोलू लागले. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं हीच संधी साधत त्याने तिला लग्नाचं आमिष दिलं.
एक दिवस आरोपीने त्याच्या मित्राच्या घरी बोलावलं आणि प्रेम व्यक्त करू लागला. लग्न करण्यासाठी तयार असल्याचं सांगत त्याने तिला विश्वासात घेतलं. एकांताचा फायदा घेत शरीर संबंध ठेवले. पीडितेने त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता. त्यानंतर जवळपास दोघे लिव्ह इनमध्ये राहिले. लिव्ह इनमध्ये राहिल्यावर त्याने अनेकवेळा तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत आपली हवस पूर्ण केली.
दोघे भाड्याने खोली घेऊन राहत होते, प्रेमात आंधळी झालेली 20 वर्षीय पीडित आपलं घर सोडून आली होती. दोघे पती पत्नीसारखे राहिले मात्र पीडित जेव्हाही लग्नाबाबत बोलायची तेव्हा तो बोलणं बंद करायचा. काही दिवसांनी आरोपीची एंगेजमेंट होणार होती. यासंदर्भात पीडितेला माहिती झाल्यावर तिने लग्नासाठी दबाव टाकला. मात्र अनिकेतने तेव्हा त्याचं खरं रूप दाखवलं.
एंगेजमेंट तुटली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीच त्याने दिली. त्यानंतर पीडितेने पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेणार असल्याचं एएसपी गजेंद्र वर्धमान यांनी सांगितलं. ही घटना मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील सत्यनारायण येथील टेकरी घोसीपुरामधील आहे.