Boss सोबत रोमान्स करणं तिला पडलं भारी, लव्ह ट्रँगलमुळे प्राणावर बेतले..

लव्ह ट्रँगलमुळे भाऊ-बहीण मारेकरी बनले. पतीने पत्नीचे न ऐकल्यामुळे तिने असा कट रचला, ज्यामुळे सर्वच हादरले. त्यामध्ये एका तरूणीला नाहक जीव गमवावा लागला.

Boss सोबत रोमान्स करणं तिला पडलं भारी, लव्ह ट्रँगलमुळे प्राणावर बेतले..
भाडेकरुंना घेऊन चाललेल्या कार चालकाचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 10:08 AM

गाझियाबाद | 7 ऑगस्ट 2023 : एका युवतीने तिच्या बॉसवर मनापासून प्रेम केलं, पण त्याच प्रेमामुळे तिचा घात झाला. तिला हकनाक जीव (lost life) गमवावा लागला. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरूणीचा नाद सोडण्यास सांगूनही पती ऐकत नाही हे पाहून त्याच्या पत्नीनेच तिच्या हत्येचे (murder) प्लानिंग केले. याप्रकरणी पोलिसांनी 5 लोकांना अटक केली आहे.

लव्ह ट्रँगलची ही कहाणी गाझियाबादच्या मुरादनगर ठाणे क्षेत्रातील आहे. खरंतर , 21 वर्षांची रागिणी हिचे बंटी या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते.तो तिचा बॉस होता. दोघेही नोएडा येथे एकत्र प्रॉपर्टीची कामे करत असत. ते दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र बंटी हा विवाहीत होता आणि त्याच्या या प्रेमप्रकरणामुळे त्याची पत्नी, राखी खूप त्रासली होती. पण बंटी काही तिचे ऐकत नव्हता.

अखेर तिने भावासह रचला प्लान

राखीने पती, बंटी याला बऱ्याच वेळे समजावले, पण त्याने रागिणीला भेटणे बंद केलेचे नाही. त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे राखी व बंटी यांच्यात सतत वाद व्हायचे. अखेर राखीने, तिचा भाऊ अमित याला हे सर्व सांगितले अन् मग त्यांनी एक भीषण प्लान आखला. राखी आणि अमितने हत्येचा कट रचला.

पुलावरून फेकला मृतदेह

त्यानंतर अमितने रागिणी हिला त्याच्या घरी, राखी हिची भेट घेण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिला शस्त्राचा धाक दाखवत कारमध्ये बसवले आणि सुराना गावाजवळ हिंडन नदीकिनारी घेऊन गेला. तेथे त्याने रागिणीची गोळी मारून हत्या केला आणि तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून ते सर्वजण तेथून फरार झाले.

मिळाला तरूणीचा मृतदेह

या प्रकरणी डीसीपी ग्रामीण विवेक चंद्र यादव यांनी सांगितले की, ३ ऑगस्ट रोजी मुरादनगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरूणीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. रागिणी असे या तरुणीचे नाव असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे. यामध्ये 2 ऑगस्टच्या रात्री मयत रागिणीला घेण्यासाठी अमित त्याच्या कारमधून तिच्या घरी गेल्याचे दिसून आले होते.

5 जणांना केली अटक

या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये खुनाचा कट रचणारी महिला राखी, तिचा भाऊ अमित, करण, अंकुर हे त्याचे दोन मित्र आणि राखीचा पती बंटी याचाही त्यामध्ये समावेश आहे. मात्र, खुनासाठी बंदूक पुरवणारे आणखी दोघे फरार असल्याचे समजते. पोलिसांनी याप्रकरणी राखीचा पती बंटी यालाही अटक केली. कारण त्याला रागिणीची हत्या झाल्याचे समजल्यानंतर त्याने पत्नीला वाचवण्यासाठी आणि आरोप नष्ट करण्यासाठी मदत केली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.