तरुणीसोबत रुग्णालयात दोस्ती, लॉजवर शरीर संबंध, नंतर फोन स्वीच ऑफ, पीडितेची भावाकडे तक्रार आणि…….

प्रेम, मैत्री कुणासोबत करावी? हा ज्याचात्याचा वैयक्तिक विषय आहे. पण आजकालची तरुण पिढी खरंतर खरंच माणसं ओळखण्यात कमी पडत आहेत (Youth cheated girl after sexual relation in Bhopal)

तरुणीसोबत रुग्णालयात दोस्ती, लॉजवर शरीर संबंध, नंतर फोन स्वीच ऑफ, पीडितेची भावाकडे तक्रार आणि.......
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 7:19 PM

भोपाळ : प्रेम, मैत्री कुणासोबत करावी? हा ज्याचात्याचा वैयक्तिक विषय आहे. पण आजकालची तरुण पिढी खरंतर खरंच माणसं ओळखण्यात कमी पडत आहे. त्यातूनच त्यांच्यासोबत वाईट घटना घडताना दिसत आहेत. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याशी दोस्ती करतात. आपल्याकडून त्यांना मिळणारा फायदा मिळाला की ते साथ सोडतात. काहीवेळा तर अशी लोकं आपल्याला धोकाही देतात. या धोक्यापासून आपल्याला सावरायला खूप वेळ जातो. यामध्ये आपलं खूप नुकसान होतं. आपला वेळ, पैसा आणि भावनाही त्यात गुंतल्याने आपलं होणारं नुकसान हे जास्त असतं. त्यामुळे अशा लोकांना वेळीच ओळखणं जास्त गरजेचं आहे. कारण असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील एका 16 वर्षीय तरुणीसोबत घडला आहे. त्यामुळे तिला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे (Youth cheated girl after sexual relation in Bhopal).

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात एका तरुणाने 16 वर्षीय तरुणीला मैत्री आणि प्रेमाच्या नावाने फसवलं आहे. या तरुणाने आधी मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं. त्यानंतर लग्नाचं आमीष दाखवून शरीर संबंधही ठेवले. मात्र, नंतर त्याने पाठ फिरवली. आपला मोबाईलच स्विट्च ऑफ केला. या घटनेचा तरुणीला मोठा धक्का बसला आहे. तिने या मानसिक धक्क्यातून लगेच सावरणं थोडं अवघड आहे. पण याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्याही ठोकल्या आहेत.

रुग्णालयापात दोघांची ओळख

फेब्रवारी महिन्यात पीडित मुलीच्या बहिणीला शहरातील हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे ती तिच्या कुटुंबियांसह रुग्णालयात थांबली होती. यावेळी तिची जावेद नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. या तरुणाच्याही एका नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. ते एकमेकांशी फोनवर बातचित करु लागले (Youth cheated girl after sexual relation in Bhopal).

आरोपी पीडितेला लॉजवर घेऊन गेला

दोघांमध्ये जवळीक इतकी वाढली की, जावेद मुलीला 25 फेब्रुवारीला शहरात फिरायला घेऊन गेला. मात्र, तो मुलीला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने घोडानक्कास क्षेत्रातील एका लॉजवर घेऊन गेला. तिथे एका खोलीत त्याने अल्पवयीन तरुणीसोबत दुष्कृत्य केलं. मुलीने विरोध केल्यानंतर जावेदने तिला लग्नाचं आमीष दाखवंल. त्यामुळे पीडितेने आपल्या कुटुंबातील कुणालाही सांगितलं नाही. मात्र, या घटनेचा फायदा घेऊन आरोपीने मुलीला जबरदस्तीने दोनवेळा शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

आरोपीने पीडितेला फसवलं, पोलिसांकडून अटक

पीडित तरुणी जावेदच्या प्रेमात आकांत बुडाली असताना त्याने मात्र तिला धोका दिला. जावेदने पीडित मुलीच्या संपर्कात न राहण्यास सुरुवात केली. तो तिला टाळू लागला. तिचा फोन येतो म्हणून त्याने आपला मोबाईलही बंद केला. जावेद सोबत संपर्क करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केल्यानंतरही त्याच्याशी संपर्क न झाल्याने पीडित तरुणी कासावीस झाली. आपल्याला फसवलं गेल्याची जाणीव तिला झाली. त्यानंतर तिने आपल्या भावाला या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिने भावासोबत पोलीस ठाण्यात जावून तक्रार केली. पोलिसांनी जावेद विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच अटकही केली.

संबंधित बातम्या :

ती कामयानी एक्सप्रेसमध्ये चढली, सोबत कुणी नाही बघून तोही चढला, पोलीस असल्याचं बतावलं आणि…….

47 व्या वर्षीही अविवाहित असल्याचा राग, चित्रपट दिग्दर्शकाची आई-वडिलांकडून हत्या

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, 19 वर्षीय नराधमाकडून पाच वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.