Ambernath Youth Injured : कंपनीतील मित्राची मस्ती जीवावर बेतली!, हायप्रेशर हवेचा पाईप पार्श्वभागात घातला, तरुणाला गंभीर दुखापत

शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा तरुण कंपनीत मशीनवर काम करत असताना त्याचा एक सहकारी मित्र तिथे आला. मित्राने मस्ती म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप या तरुणाच्या पार्श्वभागात घातला.

Ambernath Youth Injured : कंपनीतील मित्राची मस्ती जीवावर बेतली!, हायप्रेशर हवेचा पाईप पार्श्वभागात घातला, तरुणाला गंभीर दुखापत
कंपनीतील मित्राची मस्ती जीवावर बेतली!Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 12:27 AM

अंबरनाथ : कंपनीतील मित्राची मस्ती (Fun) एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. कंपनीतील मित्राने या तरुणाच्या पार्श्वभागात हायप्रेशरचा हवेचा पाईप (Air Pipe) घातला. त्यामुळे या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत (Injured) झाली आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असून ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे. तरुणाने हा प्रकार मस्तीत घडला असल्याचं सांगितलं असून, आपल्याला कोणतीही तक्रार करायची नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र या प्रकारामुळे आपली मस्ती एखाद्याच्या कशी जीवावर बेतू शकते, हे समोर आलं आहे.

आतड्यांमध्ये हवा जाऊन गंभीर दुखापत

अंबरनाथच्या वडोळ गाव परिसरातल्या एका कंपनीत जखमी तरुण काम करतो. गुरुवारी रात्रीपाळीला हा तरुण कामावर आला होता. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा तरुण कंपनीत मशीनवर काम करत असताना त्याचा एक सहकारी मित्र तिथे आला. मित्राने मस्ती म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप या तरुणाच्या पार्श्वभागात घातला. यामुळे ही हायप्रेशरची हवा तरुणाच्या आतड्यांमध्ये जाऊन त्याला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आणि तो क्षणार्धात खाली कोसळला. यावेळी त्याच्या त्याच मित्राने त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. या तरुणाला तपासल्यानंतर त्याचं तातडीने ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच त्याची प्रकृती सध्या अतिशय नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. (Youth seriously injured due to friends prank in Ambernath)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.